मृग, हस्त बहराच्या डाळिंब बागेतील नियोजन
मृग, हस्त बहराच्या डाळिंब बागेतील नियोजन

मृग, हस्त बहराच्या डाळिंब बागेतील नियोजन

डाळिंबाच्या मृग, हस्त बहराच्या बागेतील नियोजन, व्यवस्थापन
Published on

मृग बहर (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था : फळ तोडणीनंतर बागेची विश्रांती अवस्था. अन्नद्रव्य व्यवस्थापन : बाग विश्रांती अवस्थेत असल्यामुळे, विश्रांती काळातील अन्नद्रव्य/खत व्यवस्थापन मागच्या सल्ल्यात दिल्याप्रमाणे करावे. कीड व्यवस्थापन : खोड किडा, शॉट / पिन होल बोरर, वाळवी, माइट्स (कोळी) आणि पाने खाणारी अळी व रसशोषक कीटक (पिठ्या ढेकूण, खवले कीड) इ. साठी नियमित निरीक्षण करा. किडीच्या प्रादुर्भावानुसार पुढील कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी) १) किडीचा प्रादुर्भाव कमी आढळल्यास, कडुनिंब आधारित कीटकनाशक किंवा ॲझाडिरेक्टिन (१००० पीपीएम) ३ मि.लि. प्रति लि. पाणी. २) रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, लॅम्बडा सायलोथ्रिन (५ % ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि. किंवा इंडोक्साकार्ब (१४.५ % एससी) ०.७५ मि.लि. किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (२५% डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम ३) शॉट होल बोरर किंवा खोड किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अ) खोडांना लेप लावण्यासाठी ः लाल माती ४०० ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २ मि.लि. अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मलम (पेस्ट) तयार करून जमिनीपासून २ ते २.५ फूट उंचीपर्यंत खोडावर लेप लावावा. वर्षातून किमान दोन वेळा वरील नमूद केल्याप्रमाणे खोडांना लेप लावण्याची शिफारस आहे. ब) आळवणी (ड्रेंचिंग) : थायामेथोक्झाम (२५ % डब्ल्यूजी) १ ते १.५ ग्रॅम अधिक प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) १.५ ते २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाचे ड्रेंचिंग करावे. हस्त - बहर (सप्टेबर-ऑक्टोबर पीक नियमन) बागेची अवस्था : फळ परिपक्वता आणि काढणी

  • अन्नद्रव्य व्यवस्थापन : फळांची काढणी आणि झाडांना विश्रांती
  • फळांची काढणी झाल्यानंतर शाखा काढून टाकण्यासाठी छाटणीचे काम हाती घ्या.
  • प्रत्येक झाडासाठी २० ते २५ किलो शेणखत किंवा १३ ते १५ किलो शेणखत अधिक २ किलो गांडूळ खत अधिक २ किलो निंबोळी पेंड वापरावी. किंवा ७.५ किलो चांगले कुजलेले कोंबडी खत अधिक २ किलो निंबोळी पेंड वापरावी.
  • रासायनिक खतामध्ये २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम कडुलिंब-लेपित युरिया / झाड) ५० ग्रॅम स्फुरद (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट / झाड) आणि १५२ ग्रॅम पालाश / झाड (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३०४ ग्रॅम सल्फेट / झाड) दिल्यानंतर हलके पाणी द्यावे.
  • जैविक फॉर्म्यूलेशन्स उदा. ॲझोस्पिरिलम एसपी, ॲस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि पेनिसिलियम पिनोफिलम यांची वेगवेगळी वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ किलो जैविक फॉर्म्यूलेशन १ टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. या मिश्रणाचे सावलीच्या ठिकाणी बेड तयार करा. त्यामध्ये ६०-७० टक्के ओलावा ठेऊन दर १ दिवसाने ते उलथापालथ करत राहावे. साधारणपणे १५ दिवसांत जिवाणूंची चांगली वाढ होते. हे मिश्रण १० ते २० ग्रॅम प्रति झाड वापरावे.
  • आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी (एएमएफ) (राइझोफॅगस इर्रेगुल्यारिस किंवा ग्लोमस इंट्राडॅलिसिस) हे १० ते १५ ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे द्यावे.
  • कीड व्यवस्थापन : १) फळमाशीमुळे होणारे नुकसान : फळमाशी झालेले नुकसान निदर्शनास आल्यास पाण्याच्या बाटलीचे सापळे १२ नग प्रति हेक्टर असे लावावेत. अशा सापळ्यांमध्ये टोरूला यीस्ट किंवा बॅक्ट्रोसेरा डॉरसाली कामगंध वापरावा. हे कामगंध दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने बदलावेत. २)फळ पोखरणारी अळी (अंडी अवस्था) : अळी किंवा अंडी यांचे प्रमाण कमी असताना एकच फवारणी घ्यावी. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पुढील प्रमाणे दोन फवारण्या घ्याव्यात. (पहिली वेगळी आणि दुसरी एकत्रित) फळे पोखरणाऱ्या अळीची अंडी आढळून आल्यास, कडुनिंब तेल किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे ७ ते १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या घ्याव्यात.* खराब झालेले किंवा छिद्र असलेले फळे असल्यास, अशी फळे काढून खड्ड्यात पुरून टाकावीत. फवारणी प्रति लिटर पाणी सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मि.लि. किंवा टोलफेनपायरॉड (१५ % ईसी) ०.७५ मि.लि. किंवा फ्लोनिकॅमिड (५०% डब्ल्यूजी) ०.७५ ते १ मि.लि. दक्षिणी दुर्गंधी कीटक (सदर्न स्टिंक बग)

  • अंडी अवस्था दिसून आल्यास, कडुनिंब तेल १ टक्का किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) या प्रमाणे फवारणी करा.
  • वाढ आणि प्रौढ अवस्था : फवारणी प्रति लिटर पाणी
  • सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मि.लि. किंवा स्पीनेटोरम (१२ % एससी) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५% ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि.
  • मिलिबग किंवा स्केल कीटक, कोळी : या कीटकांचा सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव आढळून आल्यास, कडुनिंब तेल १% किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) अधिक पोंगामिया तेल प्रत्येकी ३ मि.लि. प्रति लिटर पाणी ही फवारणी करा. मिलीबग किंवा स्केल कीटक यांचा उशिरा प्रादुर्भाव आढळून आल्यास, थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५ % झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.७५ मि.लि. प्रति लिटर - फवारणीद्वारे. माइटचा (कोळी) उशिरा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फेनाक्झाक्वीन (१०% ईसी) १.५ मि.लि. किंवा फेनप्रॉक्सिमेट (५ % ईसी) ०.४ मि.लि. प्रति लि. पाणी अशी फवारणी करावी. टीप : फवारणी शक्यतो संध्याकाळी घ्यावी. त्यासोबत स्प्रेडर स्टिकर ०.२५ ते ०.३० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळावे. ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर) ॲग्रोवन टीप* ः पोंगामिया (करंज बियांचे तेल हे ३ मि.लि. प्रति लि. पाणी किंवा कडुनिंबयुक्त घटकासोबत (३ अधिक ३ मि.लि.) प्रति लिटर या प्रमाणे ७ ते १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या घेतल्यास एनआरसीच्या प्रक्षेत्रावरील चाचण्यांमध्ये चांगले निष्कर्ष मिळत असल्याचे दिसते. मात्र यासाठी अद्याप ॲग्रेस्को शिफारस अथवा लेबल क्लेम नाहीत.  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com