

मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ तोडणीनंतर बाग ताणावर सोडणे. अन्नद्रव्य व्यवस्थापन – १) फळ तोडणी झाल्यानंतर त्यातील फांद्या काढून झाडांची छाटणी करावी. २) प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो शेणखत किंवा १३-१५ किलो शेणखत अधिक गांडूळखत २ किलो अधिक निंबोळी २ किलो किंवा कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रति झाड द्यावे. ३) रासायनिक खतामध्ये २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम कडुनिंबयुक्त युरिया प्रति झाड), ५० ग्रॅम स्फुरद (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड) आणि १५२ ग्रॅम पालाश प्रति झाड (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३०४ ग्रॅम सल्फेट प्रति झाड) द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. कीड व्यवस्थापन - खोड किडा, शॉट किंवा पिन होल बोरर, वाळवी, माइट्स (कोळी) आणि पाने खाणारी अळी इ. साठी नियमित निरीक्षण करा. निरीक्षणामध्ये वरील पैकी किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास पुढील कीटकनाशकांचा वापर करावा. गरजेनुसार पुन्हा कीटकनाशक बदलून १५ ते २० दिवसांच्या पुढील फवारणी घ्यावी. १. प्रादुर्भाव नसला किंवा किडीचा कमी प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी कडुनिंब तेल किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. अधिक ०.२५ मि.लि. स्टिकर स्प्रेडर प्रति लिटर पाणी. २. रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायलोथ्रिन (५ % ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि किंवा इंडोक्साकार्ब (१४.५ % एससी) ०.७५ मि.लि. किंवा सायंॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा थायामेथॉक्झाम (२५ % डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम या सोबत ०.२५ मि.लि. स्प्रेडर स्टिकर मिसळावे. ३) शॉट होल बोरर या कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, आळवणी (ड्रेंचिंग) प्रति लिटर पाणी थायामेथॉक्झाम (२५% डब्ल्यूजी) १ ते २ ग्रॅम अधिक प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) १ ते २ मि.लि. हस्त-बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर पीक नियमन) बागेची अवस्था ः फळधारणा, फळ वाढ आणि पक्वता. अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन १) ००:५२:३४ (मोनो-पोटॅशियम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे तीन फवारण्या कराव्यात. २) मॅंगनीज सल्फेट ६ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. ३) विद्राव्य खते एन: पी: के: अनुक्रमे ००:५२:३४ (मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) १२.८० किलो, युरिया ३१.४० किलो आणि ००:००:५० (सल्फेट ऑफ पोटॅश) ११.५० किलो प्रति हेक्टर प्रति वेळ असे सिंचनाद्वारे ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा द्यावे. ब) कीड व्यवस्थापन - १) फळ पोखरणारी अळी (फवारणी प्रति लिटर पाणी) जर पोखरणाऱ्या अळीची अंडी फळांच्या पृष्ठभागावर दिसली तर, ७-१० दिवसाच्या अंतराने कडुनिंब तेल १ टक्के किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा पोंगामिया (करंज बिया) तेल ३ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मि.लि. जर प्रादुर्भाव अधिक असेल तर कडुनिंबाचे तेल १ टक्के किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर अधिक पोंगामिया (करंज बिया) तेल ३ मिली प्रति लिटर हे दोन्ही मिसळून स्टिकरसह घेता येईल. सच्छिंद्र फळे दिसून आल्यास, सर्व सच्छिद्र फळे काढून एखाद्या खड्ड्यात गाडून नष्ट करावीत. फवारणी प्रति लिटर पाणी सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५ % एससी) ०.७५ मि.लि. किंवा टॉल्फेनपायरॅड (१५ % ईसी) ०.७५ मि.लि. किंवा फ्लॉनीकामिड (५०% डब्ल्यूजी) ०.७५ ते १ मि.लि. या सोबत स्प्रेडर स्टिकर ०.२५ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणीवेळी मिसळावे. २) सदर्न स्टिंक बग : फवारणी प्रति लिटर पाणी अंडी अवस्था : कडुनिंब तेल (१%) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. अधिक पोंगामिया (करंज बिया) तेल ३ मि.लि. अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. पिल्लू आणि प्रौढ अवस्था : सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मि.लि. किंवा स्पायनेटोराम (११.७% एससी) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन (५% ईसी) ०.५० मि.लि. सोबत ०.२५ मिली स्प्रेडर स्टिकर प्रति लिटर फवारणीवेळी मिसळावे. बहार - अंबिया (जानेवारी-फेब्रुवारी पीक नियमन) बागेची अवस्था – ताणावर असलेली बाग आणि पीक १५ जानेवारी नंतरचे पीक नियमन. १) अन्नद्रव्य व्यवस्थापन – बहार धरतेवेळी पहिले पाणी देतांना १) २५-३० किलो शेणखत किंवा १५-२० किलो शेणखत अधिक २ किलो गांडूळखत अधिक २ किलो निंबोळी पेंड प्रति झाड किंवा ७.५ किलो पूर्ण कुजलेले कोंबडी खत अधिक २ किलो निंबोळी पेंड प्रति झाड या प्रमाणे द्यावे. २) २.५-२.८ किलो जिप्सम आणि ८०० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति झाड मातीत मिसळून द्यावे. ३) जैविक फॉर्मूलेशन (उदा. ॲझोस्पिरिलम एसपी एस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि पेनिसिलियम पिनोफिलम ही प्रत्येकी वेगवेगळे) प्रत्येकी एक किलो आपल्या शेतात कुजलेल्या एक टन शेणखतात मिसळावे. हे मिश्रण सावलीमध्ये बेड किंवा गादीवाफ्यात तयार करून, त्यामध्ये ६०-७० टक्के ओलावा राहिल, याची काळजी घ्यावी. दर १ दिवसांने ते उलथा पालथ करत राहावे. साधारणपणे १५ दिवसांत यात जिवाणूची चांगली वाढ होते. हे मिश्रण प्रति झाड १०-२० ग्रॅम प्रमाणात वापरावे. ४) ऑर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी, (एएमएफ) (राईझोफॅगस इर्रेगुल्यारीस ग्लोमस इंट्राडॅलिसिस) हे १०-१५ ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे द्यावे. ५) खते दिल्यानंतर लगेचच हलके पाणी द्यावे. ब) कीड व्यवस्थापन – १. पहिल्या फवारणीत निम तेल (१%) किंवा ॲझाडीरेक्टिन (१०००० पीपीएम) ३ मि.लि अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. किंवा पोंगामिया (करंज बियांचे तेल) ३ मि.लि. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. प्रति लिटर ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारावे. जर प्रादुर्भाव अधिक असेल तर वरील दोन्ही घटक (ॲझाडीरेक्टिन आणि पोंगामिया) मिसळून वापरता येईल. २. पहिल्या फवारणीच्या ७-१० दिवसानंतर दुसरी फवारणी, प्रति लिटर पाणी सायंॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा थायामिथॉक्झाम (२५ % डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा टोलफेनपायरॉड (१५ % इसी) ०.७५ मि.लि. किंवा फ्लोनिकॅमिड (५० % डब्ल्यूजी) ०.७५ ते १ मि.लि. सोबत स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. प्रति लिटर फवारावे. ३) फूल कळी येताना/ फुलधारणा, फवारणी प्रति लिटर पाणी स्पायनेटोरम (११.७ % एससी) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५% एससी) ०.५ मि.लि. सोबत ०.२५ मि.लि. प्रति लिटर स्टीकर स्प्रेडर फवारावे. दिनकर चौधरी, ९४०३३९०६२७ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.