नारळाला द्या शिफारशीत खतमात्रा

coconut advisory
coconut advisory
Published on
Updated on

नारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे वर्ष २ फूट, तिसरे वर्ष ३ फूट, चौथे वर्ष ४ फूट व पाचवे वर्ष ५ ते ६ फूट अंतरापर्यंत गोलाकार पद्धतीने खत द्यावे. माती परीक्षणानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी. नारळ रोपाच्या लागवडीनंतर खत, पाणी व्यवस्थापन आणि आच्छादन करणे, नारळ झाडांची साफसफाई करणे, तयार नारळाची काढणी वेळेवर करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यानंतर लगेच पाणी आणि खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नारळाला सर्वसाधारणपणे वर्षाला बारा पाने येतात. तसेच पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडाच्या पानातून पोय (फुलोरा) येते. त्याचे पुढे फळात रूपांतर होते. खत नियोजन

वर्ष कंपोस्ट/शेणखत (किलो) युरिया (ग्रॅम) सिंगल सुपर फॉस्फेट (ग्रॅम) म्युरेट ऑफ पोटॅष (ग्रॅम)
पहिले वर्ष १ घमेले ५०० ६०० ३२०
दुसरे वर्ष- २ घमेली १००० १२०० ६४०
तिसरे वर्ष ३ घमेली १५०० १८०० ९६०
चौथे वर्ष ४ घमेली २००० २४०० १२८०
पाचवे वर्ष ५ घमेली २२२५ ३००० १६००

टीप

  • वरील खते उपलब्ध न झाल्यास १९ः१९ः१९ सहा किलो किंवा १५ः१५ः१५ साडे सात किलो किंवा सेंद्रिय खत (५ः१०ः५) १५ किलो प्रति झाड तीन वेळा विभागून द्यावे.  
  • वरील खतांपैकी युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश ही खते वर्षातून तीन वेळा (जून - ऑक्‍टोबर - फेब्रुवारी) विभागून द्यावीत. सिंगल सुपर फॉस्फेट व शेणखताचा पूर्ण हप्ता जूनमध्ये द्यावा. या खतांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत प्रत्येक हप्त्याला अर्धा किलो असे एकूण १.५ किलो द्यावे. सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये प्रती माड ५ किलो निंबोळी पेंड द्यावी.  
  • खत देण्याची पद्धत : नारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे वर्ष २ फूट, तिसरे वर्ष ३ फूट, चौथे वर्ष ४ फूट व पाचवे वर्ष ५ ते ६ फूट अंतरापर्यंत (खोडापासून) गोलाकार पद्धतीने खत द्यावे.
  • नारळ सोडण भुशापासून खत निर्मिती  

  • नारळाच्या सोडणामधील भुशामध्ये नत्राचे प्रमाण फारच कमी असते. तर मोठ्या प्रमाणात लिग्नीन आणि फायटोटॉक्‍झीक पॉलीफिनॉल असतात. त्यामुळे हे खत म्हणून वापरण्याअगोदर त्याचे कंपोस्टखतात रूपांतर गरजेचे आहे.  
  • सोडण भुसा हा अनेक वर्षे ऊन किंवा पाऊस यामध्ये ठेवल्यास त्यामधून विषारी घटक निघून जातात. त्यानंतरच त्याचा खत म्हणून उपयोग करावा.  
  • ताज्या सोडण भुशात कर्ब : नत्राचे प्रमाण १००ः१ असते. त्यामुळे सूक्ष्म जिवांची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी भुशामध्ये नत्र युक्त सेंद्रिय किंवा रासायनिक खते वापरणे गरजेचे असते.
  • संपर्क ः डॉ. व्ही. व्ही. शिंदे, ७०३०८१८९५७ ( प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये जि.रत्नागिरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com