फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचे

उन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा वेळी पुढील उपाययोजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतात.
apply bordo paste on stem of trees and use drip irrigation method for irrigation
apply bordo paste on stem of trees and use drip irrigation method for irrigation
Published on
Updated on

उन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा वेळी पुढील उपाययोजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतात. बाग स्वच्छ ठेवणे  हलकीशी मशागत करावी. कारण तणापासून होणारे बाष्पीभवन टाळता येईल. बाष्प रोधकाचा वापर पोटॅशिअम नायट्रेट (१ ते १.५ टक्के म्हणजेच ) १० ते १५ ग्रॅम प्रति लीटर पाणी किंवा केओलीन (८ टक्के म्हणजेच) ८० ग्रॅम प्रति लीटर पाणी या द्रावणाची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने फळबागाच्या पानावर करावी. यामुळे पानांद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन किंवा बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीवर आच्छादन बाष्पीभवनाद्वारे जमिनीतील पाणी सुमारे ७० टक्के नाश पावते. शेतातील काडी कचरा, धसकटे, गवत, भुसा, तुरीच्या काड्या इ. सेंद्रिय घटकांचा ७ ते ८ सें.मी. जाडीचा थर आच्छादनासाठी वापरावा, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. ठिबक सिंचनाचा वापर टंचाई सदृश परिस्थितीमध्ये ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर आहे. झाडांना मोजून पाणी दिल्यामुळे वाढ चांगली होते. मडका सिंचन ज्यांना ठिबक सिंचन काही कारणांनी शक्य नाही, त्यांनी झाडाच्या आकाराप्रमाणे आळ्यात ४ ते ५ मडके बसवावीत. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडाच्या मुळांना पाणी द्यावे. सर्वसाधारण एका मडक्यात ३ ते ४ लिटर पाणी ओतावे. मडक्यातील पाणी झिरपत राहून झाडाच्या तंतुमय मुळाना उपलब्ध होते. झाडे जिवंत राहतात. मातीचा थर झाडांच्या खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो. बहार धरू नये टंचाई सदृश परिस्थितीमध्ये फुले लागल्यास ती काढून टाकावीत. कोणताही बहार धरू नये. झाडाचा आकार मर्यादित ठेवणे झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा, त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास मदत होते. झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावणे झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावल्यामुळे सूर्य किरणे परावर्तीत होतात. बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होतो. १०. शक्यतो बागांना सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे. संपर्क- डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३ (विषय विशेषज्ञ -कृषि विद्या, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि.बीड.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com