
कार्प (carp fish) जातीच्या माशानंतर सर्वात जास्त संवर्धन केला जाणारा मासा म्हणून तिलापिया मासा (Tilapiya fish) प्रसिद्ध आहे. तिलापिया माशाचे मूळ स्थान आफ्रिका आहे. तिलापिया माशांच्या निलोटीका तिलापिया आणि मोझांबिका तिलापिया या दोन प्रमुख जाती आहेत. मोझांबिका माशाला डुक्कर मासा असही म्हटले जाते. निलोटीका तिलापियाच्या शरीरावर सात निळ्या रंगांचे पट्टे असतात. हा मासा दिसायला अतिशय आकर्षक असतो. याच दोन जातीच्या संकरातून रेड तिलापिया (red tilapiya)ही जात तयार झाली आहे.
१९५२ मध्ये भारत सरकारने तिलापिया मासा भारतात (india) आणला. तिलापिया मासे अगदी कमी वयात प्रजननक्षम होतात. त्यामुळे व्यवसायिकदृष्ट्या मत्स्यशेती करताना निर्बंध येऊ शकतात. यावर उपाय म्हणून मादी तिलापिया लहान असतानाच इंजेक्शन देऊन त्यांचे रुपांतर नर माशामध्ये केले जाते. लहान वयातच प्रजननासाठी उर्जा वापरल्याने माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तिलापिया माशांचे लैंगिक पद्धतीने संवर्धन करणे फायदेशीर ठरते.
राजीव गांधी सेंटर फॉर अॅक़्वाकल्चर या ठिकाणी २०११ साली तिलापिया माशाच्या संवर्धनासाठी काही सूचना आणण्यात आल्या. या सुचनाचे पालन करून जो कोणी गिफ्ट टेक्नॉलॉजीचा वापर करू इच्छितात त्यांना आर.जी. सी. कडून तिलापियाचे मत्स्यबीज मिळते. गिफ्ट टेक्नॉलॉजीमध्ये आठ वेगवेगळ्या तिलापिया माशांच्या जाती घेऊन त्यांचे संकर केले गेले आहे.
तिलापिया माशांचे ब्रीडिंग झाल्यानंतर फलित अंडी मादीच्या तोंडामध्ये ठेवली जातात. या ठिकाणी अंड्याना ऊब दिली जाते. यामुळे फलित अंड्याचा जगण्याचा दर १०० टक्के आहे. तिलापियाचे मस्त्यबिजाचे संकलन करताना मादीच्या तोंडातून बिजाचे संकलन केले जाते. इनक्युबेशनमध्ये पिल्ले बाहेर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून २१ दिवसापर्यंत संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन मादी पिल्लांचे नर पिल्लांमध्ये रुपांतर केले जाते. यामुळे मादी संप्रेरकाचे प्रमाण कमी होऊन नर संप्रेरकाचे प्रमाण वाढवले जाते.
हे मासे विविध प्रकारचे खाद्य ग्रहण करतात. तिलापिया माशाचे तलावात तसेच पिंजऱ्यातही संवर्धन करता येते. या माशाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत पूर्व परवानगी घ्यावी लागते.
मत्स्यसंवर्धनासाठी तलावांची पूर्वतयारी केल्यानंतर १० ग्रॅम वजनाच्या मत्स्यबीजांची साठवणूक ५ नग एका चौरस किलोमीटरसाठी अशी करावी. या माशाची वाढ नैसर्गिक तसेच कृत्रिम खाद्याचा वापर करून करता येते. खाद्याचे आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यास ६ ते ७ महिन्यात हा मासा ४०० ते ५०० ग्रॅमपर्यंत वाढतो. इतर माशांच्या जातींपेक्षा या माशाची वाढ झपाट्याने होते. या माशांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. माशांची चव अतिशय उत्तम आणि काट्याचे प्रमाण कमी असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.