मासे टिकवण्याच्या पद्धती कोणत्या?

माशांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, मासे लवकर खराब होतात. मासळीला लवकर बर्फामध्ये ठेवली नाही तर ती खाण्यालायक राहत नाही. बर्फात मासळी ३ ते ५ दिवस ताजी राहू शकते. मासळीला जास्त दिवस जास्त दिवस खाण्यालायक ठेवायची असेल तर तिच्यावर प्रक्रिया केली पाहिजे.
What are the different methods for preservation fish?
What are the different methods for preservation fish?

माशांमध्ये (fish) पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, मासे लवकर खराब होतात. मासळीला लवकर बर्फामध्ये ठेवली नाही तर ती खाण्यालायक राहत नाही. बर्फात मासळी ३ ते ५ दिवस ताजी राहू शकते. मासळीला जास्त दिवस जास्त दिवस खाण्यालायक ठेवायची असेल तर तिच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. हेही पाहा- गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिल्यास गायीला होतो हा आजार!  मासळी टिकविण्याच्या विविध पद्धती खालीलप्रमाणे- मासे गोठविणे- (fish freezing) मासे एकत्रित किंवा वेगवेगळे करून गोठविता येतात. शीत यंत्राने माशांचे  तापमान शून्यापेक्षा फार कमी म्हणजे -२०° ते ४०°C ला आणून गोठविले जाते. हे मासे असेच -२०°C ला साठवले जातात. अशा प्रकारे गोठविलेली (freezing)मासळी मुख्यत्वेकरुन परदेशात निर्यात केली जाते. या पद्धतीत जीवाणूंची क्रिया या तापमानाला थांबली जाते. हेही वाचा- जनावरांचे विलगीकरण का करतात ? मासे सुकविणे- (fish drying) समुद्रकिनारी उन्हामध्ये मासे सुकविण्याची पद्धत फार जुनी आहे. पण असे सुकविलेले मासे वाळूने दूषित होत असतात. खारवणे- (fish salting) मिठात किंवा मिठाच्या द्रावणात बुडवून माशांमधील पाण्याचे प्रमाण २० ते २४ टक्के कमी करता येते. मिठामुळे माशांची जंतूंमुळे खराब होण्याची क्रिया रोखली जाते. ती सर्वसाधारण तापमानातही काही दिवस चांगली राहतात. हेही वाचा- गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त कॅल्शिअम देऊ नये ? मासे हवाबंद डब्यात ठेवणे- (fish canning) मासे तेलात किंवा मिठाच्या द्रावणात हवाबंद करुन नंतर ते डबे निर्जंतुक केले असता जवळ जवळ वर्षभर टिकतात व आपल्याला हवे तेव्हा खाता येतात. निर्जंतुकीकरणामुळे जंतू नष्ट होतात. हवाबंद डब्यातले मासे परदेशात फार प्रचलित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com