Poultry Disease : कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे काय आहेत?

Poultry Care : संधिवात अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये आढळून येतो. या रोगामुळे दहा ते पंधरा टक्के मरतुक होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन कराव लागत.
Poultry Disease : कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे  काय आहेत?

Poultry Management : बरेच पोल्ट्रीधारक पक्षांना जीवनसत्व ड पुरवठा जास्त प्रमाणात करतात. याशिवाय जीवनसत्व अ पुरवण्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे कोंबड्यांमध्ये संधिवात आजार दिसून येतो.

संधिवात अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये आढळून येतो. या रोगामुळे दहा ते पंधरा टक्के मरतुक होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन कराव लागत. कोंबड्यांतील संधिवाताचे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी महारष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.   

कोंबड्यांतील संधिवाताचे प्रकार 

संधिवात हा रोग प्रामुख्याने दोन प्रकारात आढळून येतो पहिला प्रकारात उदर पोटातील अवयवाच्या बाह्य आवरणाखाली मुख्यत्वे करून मूत्रपिंडामध्ये युरियाचे क्षार जमा होतात.

दुसऱ्या प्रकारात हाडांच्या सांध्यात युरियाचे क्षार जमुन हालचालीला प्रतिबंध होतो. हा रोग चयापचयाच्या व्यवस्थापनेशी निगडित असून त्याची विविध कारणे आहेत. 

Poultry Disease : कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे  काय आहेत?
Tomato Phulgal : टोमॅटो पिकामध्ये फुलगळ होण्याची कारणे काय आहेत?

संधिवात रोगाची कारणे काय आहेत?

पक्षाच्या मूत्रपिंडाचे आजार 

जीवनसत्व अ ची कमतरता

जीवनसत्व ड ची अधिक मात्रा 

मांसल कोंबड्याच्या खाद्यातील जास्तीचे कॅल्शियम 

पक्षांना जड क्षारयुक्त पाणी पिण्यास दिल्यास 

खाण्याचा सोडा जास्त प्रमाणात पक्षांना दिल्यामुळे हा रोग होतो तसंच अनुवंशिकतेमुळे ही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याच अढळून  आलं आहे.

रोगाची लक्षणे  

पक्षाची हालचाल कमी होते. खाद्य व पाणी कमी पितात. पंख विखुरलेले असतात. पक्षी मलूल दिसतात.

मृतपक्षांचे विच्छेदन केले असता पहिल्या प्रकारामध्ये सर्व उदरपोकळीतील अवयवांवर बारीक खडू सारखी पांढरी भुकटी फवारल्यासारखी वाटते. पोटाचे व मांडीचे स्नायू पाण्याच्या कमतरतेमुळे कातडीला चिकटलेले असतात. 

उपचार 

कोंबड्यांमध्ये संधिवात आढळल्यास पशुवैद्यक तज्ञाकडून उपचार करावा. उपचारांमध्ये सहाय्यक औषधांचा वापर वाढवावा.

खाद्य व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात. सर्वप्रथम खाद्यातील प्रथिनांच व क्षारांचे प्रमाण कमी करावे जेणेकरून मूत्रपिंडावर जास्त ताण पडणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com