Team Agrowon
वातावरणामध्ये बदल झाल्यास झाडांवर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे फुलगळ होऊ शकते.
पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची आणि बोरॉनची कमतरता असणे.
अनियमित पाण्याचे नियोजन. रसशोषक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव.
नत्रयुक्त खतांचा होणारा अति वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त फवारणीमुळे मधमाशी प्लॉटमध्ये येत नाही परिणामी परागीकरण न होऊन फळधारणा होत नाही व लागलेली फुलेही वाया जातात.
अधिक फूलधारणा होऊन फूलगळ रोखण्यासाठी, लागवडीपासूनच मुख्य अन्नद्रव्ये,दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रवांचा योग्य व संतुलित प्रमाणात पुरवठा करावा.
पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. संजीवके वापरताना योग्य काळजी घ्यावी.