अशी करा पैदाशीसाठी मेंढीची निवड!

मेंढीपालन हे मांस उत्पादनाच्या बरोबरीने लोकर, दूध आणि लेंडीखतासाठीही केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने डेक्कनी, मडग्याळ आणि बेल्लारी मेंढ्याच्या जातींचे संगोपन केले जाते.
मेंढी आणि कोकरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
मेंढी आणि कोकरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Published on
Updated on

मेंढ्यांमध्ये (sheep) निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक (hereditary)सुधारण्यासाठी दूध उत्पादन, कोकराच्या वाढीचा दर लक्षात घेऊन सर्वोत्कृष्ट पाच ते दहा टक्के मेंढ्या निवडून त्या पैदाशीसाठी वापराव्यात. मेंढीपालन (sheep rearing) हे मांस (mutton) उत्पादनाच्या बरोबरीने लोकर (wool), दूध (milk) आणि लेंडीखतासाठी देखील केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने डेक्कनी (deccani), मडग्याळ (Madgyal) आणि बेल्लारी (Bellari) मेंढ्याच्या जातींचे संगोपन केले जाते.

मेंढीपालनात सशक्त पैदाशीचे महत्त्व

या व्यवसायाचे यश पैदाशीसाठी वापरलेली मेंढी आणि नर यावर अवलंबून असते. मेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक सुधारणांसाठी कोकराच्या वाढीचा दर लक्षात घेऊन सर्वोत्कृष्ट पाच ते दहा टक्के मेंढ्या निवडून त्या पैदाशीसाठी वापराव्यात. व्यवसायाची सुरुवात जास्तीत जास्त २० मेंढ्या आणि एक नर घेऊन करावी. ही निवड केवळ त्यांचे शारीरिक गुणधर्म पाहून न करता, त्यासाठी निवडीचे वेगवेगळे पैलू काटेकोरपणे तपासून घ्यावेत. उत्पादनक्षमतेत आनुवंशिक सुधारणा ही शाश्‍वत सुधारणा असते. ही सुधारणा पुढील पिढीत सुधारणा घडवून आणते.

पैदाशीच्या नराची आणि मेंढीची निवड

- पैदाशीच्या नरांना योग्य आकाराचा आणि स्वतंत्र निवारा असावा.

- नराच्या खुरांचा वाढलेला भाग वेळोवेळी कापावा, कारण तो प्रजननात बाधा उत्पन्न करू शकतो.

- पैदाशीसाठीची मेंढी आकाराने मोठी असावी. पाय सरळ, पिळदार व खूर उंच असावेत.

- मेंढी लठ्ठ नसावी, ती टवटवीत व चपळ असावी. मेंढीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.

- एक ते दोन वर्षे वयाची म्हणजे दोन ते चार दाती मेंढी विकत घ्यावी.

- निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या मेंढीचे करडू खरेदी करावे.

- करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.

- चांगली वाढ आणि मोठ्या आकाराच्या मेंढीचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा. मादीचे वय १४ ते १६ महिने असताना व वजन २२ ते २५ किलो असताना पैदाशीसाठी त्यांचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com