शोभिवंत माशांचे पॅकिंग, वाहतूक, विक्री नियोजन

शोभिवंत मासे बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवायचे असतील तेव्हा विक्री योग्य आकार, अपेक्षित दर या गोष्टींचा विचार करावा.
Fish Packing, Sell Process
Fish Packing, Sell ProcessAgrowon

शोभिवंत मासे संवर्धन करताना होणारी हाताळणी, मासे काढण्याची क्रिया, पुढील वाहतूक या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. शोभिवंत मासे बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवायचे असतील तेव्हा विक्री योग्य आकार, अपेक्षित दर या गोष्टींचा विचार करावा.

शोभिवंत मत्स्य व्यवसाय (Fishing business) क्षेत्रामध्ये आकर्षक चमकदार, निरोगी मासे कोणतीही इजा न होता जिवंत अवस्थेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यावरच या क्षेत्रामधील व्यावसायिकांचे यश अवलंबून आहे. शोभिवंत मासे (Fish) संवर्धन (Promotion) करत असताना प्रजनन व मत्स्यबीज निर्मितीपासून ते मासे विक्री करेपर्यंत विविध टप्प्यांवर वेळोवेळी माशांची काढणी आणि हाताळणी करण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे या क्रिया करत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

माशांची हाताळणी :
१) मासे विशेषत: मत्स्यबीज (Fish seed) अतिशय संवेदनशील असून चुकीच्या पद्धतीने हाताळणी करणे, चुकीची जाळी वापरणे या गोष्टींमुळे तणावाखाली येतात. मरतुकीची शक्यता वाढते. त्यामुळे मासे काढताना वापरावयाचे जाळे हे मुलायम कापडापासून बनविलेले असावे. ते योग्य पद्धतीने माशांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने तलाव किंवा टाकीमध्ये फिरवावे.
२) तलाव (Lake) किंवा टाकीच्या तळाला कचरा, विष्ठा साचलेली असल्यास अगोदर सायफनिंग करून काढून टाकावी. अन्यथा, जाळी फिरवताना सर्व घाण पाण्यामध्ये उसळून माशांना त्यापासून इजा होते किंवा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
३) ज्या वेळेस मासे बाजारामध्ये विक्रीसाठी (Market Sell) पाठवायचे असतील तेव्हा अगोदर मासे विक्री (Fish Sell) योग्य आकाराचे आहेत का? आपल्याला अपेक्षित दर मिळतो आहे का? या गोष्टींचा विचार करावा.

Fish Packing, Sell Process
ताजे मासे कसे ओळखावेत ?

विक्रीसाठी माशांची वाहतूक : (Fish Sell Transport)
१) ज्या संख्येमध्ये मासे वाहतूक करावयची आहे, ते काळजीपूर्वक संवर्धन तलाव किंवा टाकीमधून काढून अनुकुलनासाठी वेगळ्या टाकीमध्ये ठेवावेत.
२) माशांचे पॅकिंग (Fish Packing) करण्याअगोदर २४ ते ४८ तास माशांना खाद्य देऊ नये. यामुळे वाहतुकीदरम्यान माशांनी टाकलेल्या विष्ठेचे प्रमाण कमी होते. पिशव्यांमधील पाणी खराब होत नाही. मासे उपाशी राहिल्याने माशांच्या शारीरिक क्रिया मंदावतात. त्यांचेद्वारे कमी प्रमाणात विद्राव्य प्राणवायू वापरला जातो.
३) माशांचे अनुकूलन करण्याच्या कालावधीमध्ये माशांची हालचाल, माशांचे पर, खवले यांची स्थिती, रंग यांचे निरीक्षण करून अयोग्य मासे वेगळे करावेत. जेणेकरून ग्राहकांपर्यंत उच्च गुणवत्तेचे मासे पोहोचतील. शेतकऱ्यांच्या (Farmer) विश्‍वासार्हतेबद्दल ग्राहकांमध्ये अनुकूल मत निर्माण होऊन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल.


माशांचे पॅकिंग: (Fish Packing)
१) माशांचे पॅकिंग करताना विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये खुली पद्धत व बंदिस्त पद्धत हे प्रमुख प्रकार आहेत.
२) खुली पद्धत ही जुनी पद्धत असून, यामध्ये एखादी टाकी, बादली किंवा हंडी यामध्ये पाणी भरून त्यामध्ये वाहतुकीचे मासे सोडले जातात. त्यानंतर योग्य ठिकाणी नेले जातात. कमी अंतरावर मासे वाहतुकीसाठी (Transport) ही पद्धत योग्य ठरते.
३) खूप मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज (Fish Seeds) किंवा मोठ्या आकारांच्या माशांची वाहतूक करण्यासाठी मोठ्या टाक्यांमध्ये पाणी भरून त्याला एरेशनची व्यवस्था करतात.
४) सध्या बंदिस्त पद्धतीने माशांचे पॅकिंग व वाहतूक करण्यात येते. याकरिता विविध आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग केला जातो. या प्लॅस्टिकच्या पिशव्या कमीत कमी ६० मायक्रॉन जाडीच्या असतात. तीक्ष्ण पर असलेल्या माशांच्या पॅकिंगकरिता जास्त जाडीच्या पिशव्या वापरल्या जातात.

Fish Packing, Sell Process
मासे टिकवण्याच्या पद्धती कोणत्या?

५) लहान आकाराचे मासे विशेषत: मत्स्यबीज पॅकिंगकरिता वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या तळाच्या कडा तिरक्या रेषेमध्ये चिकटवलेल्या असाव्यात. ज्यामुळे पिशव्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर कडा दुमडून त्यामध्ये मत्स्यबीज (Fish Seeds) चिरडले जाणार नाही. पिशव्यांमध्ये एक तृतीयांश भागामध्ये पाणी भरले जाते. उर्वरित दोन तृतीयांश भागांमध्ये ऑक्सिजन भरला जातो. पिशव्या रबराने गाठ मारून पॅक केल्या जातात.
६) लांब अंतरावर वाहतूक करताना पिशव्या सुरक्षित राहण्यासाठी पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये ठेऊन सभोवताली थर्माकोल किंवा कागदाचे आच्छादन घालावे. चिकटपट्टीचा वापर करून खोके बंद करावे. माशांचा प्रकार, आकार, वाहतुकीसाठी लागणारा कालावधी, पिशव्यांचा आकार यानुसार एक पिशवीमध्ये किती संख्येने मासे ठेवावेत याचे प्रमाण ठरते.
७) मासे तलावापासून बाजारपेठेमध्ये (Fish Market) पोहोचविण्याकरिता अगोदर उपलब्ध वाहतुकीच्या साधनांची पूर्ण माहिती करून घ्यावी. त्यांची तुलना करून कमीत कमी कालावधीमध्ये तसेच कमी खर्चामध्ये वाहतूक करून देणारा पर्याय निवडावा. यामुळे वाहतुकीदरम्यान माशांवर निर्माण होणारा तणाव कमी होतो. उत्पादन खर्चामध्ये बचत होते.

८) वाहतुकीदरम्यान माशांवरील तणाव दूर करणेसाठी विविध प्रकारची रसायने वापरली जातात. ही रसायन माशांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करून माशांच्या शारीरिक क्रिया मंदावतात, माशांवरील तणाव दूर होतो. या प्रकारची रसायने (Chemical) वापरताना अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचे प्रमाण व वापरण्याची पध्दत यांची सखोल माहिती करून घ्यावी. त्याबाबत चाचणी घेऊन अपेक्षित कौशल्य प्राप्त झाल्यावरच या पद्धतींचा वापर करावा. कारण या प्रकारची रसायने वापरताना काही चूक झाल्यास माशांची मरतूक होते.
९) बाह्य स्रोताकडून मासे जेव्हा येतात, त्या वेळेस जर ते मत्स्यसंवर्धन युनिटमध्ये (Fisheries Unit) आणले असतील तेव्हा पुढील संवर्धनाअगोदर आणि बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आले असतील तर ते विक्री अगोदर पाच ते सात दिवस विलगीकरणामध्ये ठेवावेत. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे नवीन माशांमधील त्रुटींचे निरीक्षण करता येते, तसेच काही रोगांचा प्रादुर्भाव असल्यास आपल्या मुख्य साठ्यामध्ये त्यांचा प्रसार होणे टाळता येते.

संपर्क :
विनय सहस्रबुद्धे, ९४२२४५३१८१
डॉ. नितीन सावंत, ९४२२९६३५३३
(मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com