काय आहेत मरळ माशाची वैशिष्ट्ये ?

मरळ माशाच्या डोक्याचा आकार हा साधारणपणे सापाच्या डोक्यासारखा असतो. हा मासा प्रामुख्याने उथळ पाण्यात आढळून येतो.
Which fish head look like fish head?
Which fish head look like fish head?Agrowon
Published on
Updated on

मत्स्यव्यवसायात सुयोग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. योग्य व्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा काळ पूर्ण केल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात.

मरळ माशाची (maral fish) सर्वसाधारण वैशिष्ट्ये

- मरळ माशाच्या डोक्याचा आकार हा साधारणपणे सापाच्या डोक्यासारखा असतो.

- हा मासा प्रामुख्याने उथळ पाण्यात (shallow water) आढळून येतो.

- मरळ माशांमधील झालेल्या विकासामुळे हा मासा हवेतील प्राणवायू श्‍वसनासाठी वापरतो.

- कमी पाण्यातही हा मासा काही दिवस जगू शकतो.

- गोड्या पाण्यात या माशाचे संवर्धन केले जाते.

- बाजारात या माशाला चांगली मागणी आहे

- हा मासा चवीला चांगला असून, अनेक औषधी गुणधर्म आहेत.

- या माशामध्ये काट्याची संख्या कमी असते.

- हे मासे मांसभक्षक असल्याने, यांच्यासोबत दुसऱ्या माशांचे संवर्धन करणे टाळावे.

Which fish head look like fish head?
झुंजार म्हातारा आणि अजस्र मासा

मरळ माशाचे बीजोत्पादन

- या माशांच्या बिजोत्पादनासाठी, चांगले प्रथिनयुक्त खाद्य पुरवावे लागते.

- प्रजननक्षम मासे पालनाकरता ६ बाय ५ बाय १ मीटर आकाराचे तले वापरले जाते. या तळ्यातील पाण्याची पातळी साधारणपणे १ मी ठेवावी लागते.

- प्रजननाकरता एका मादिसोबत दोन नर मासे ठेवले जातात.

Which fish head look like fish head?
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी

- ६ ते १० तासानंतर मासे अंडे द्यायला सुरुवात करतात. अंडी देण्याचा कालावधी संपण्याकरता २४ ते ३० तासांचा कालावधी लागतो.

- या माशांमध्ये अंड्याचे फलन हे शरीराबाहेर होते. फलित अंडी पाण्यावर तरंगू लागतात.

- या माशांच्या अंड्याचा फलनाचा दर साधारणपणे ७० ते ९० टक्क्यापर्यंत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com