Jowar plantation for fodder purpose
Jowar plantation for fodder purposeAgrowon

ज्वारीसाठी कोणती बीजप्रक्रिया फायदेशीर?

चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी करताना एकरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. चारा पिकासाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, एसएचजी ५९-३, सी. एस.एच-१४, १६, १३, सी. एस. व्हि-१५, पी.के.व्हि- ४०० या जातींची निवड करावी.

पेरणीपूर्वी बियाणावर अॅझोटोबॅक्टर (azatobactor) जीवाणूंची बीजप्रक्रिया प्रक्रिया करावी अथवा बियाणे गोमुत्रामध्ये (cow urine) बुडवून घ्यावे. असे केल्याने खराब बियाणे काढून टाकण्यास मदत होते. हे बियाणे गोणपाटावर पसरवून घ्यावे. गोमुत्रामध्ये संप्रेरकाचे प्रमाण भरपूर असते. गोमुत्र हे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक अशा तिन्ही प्रकारचे कार्य करते. १० किलो बियाण्यांसाठी २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २०० ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरू शकतो. बीजप्रक्रिया केल्यानंतर २४ तासांच्या आत पेरणी करावी.

ज्वारीच्या लागवडीसाठी काळी-कसदार जमीन फायद्याची ठरते. मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. हलकी जमीन टाळावी. चोपण जमिनीत ज्वारीची लागवड टाळावी. दोन ओळीतील अंतर एक फूट आणि दोन बियाणातील अंतर अर्धा फूट इतके ठेवावे. एका ठिकाणी ४ ते ५ ज्वारीचे बी टाकावे.

Jowar plantation for fodder purpose
चवळीप्रमाणे दिसतो राईसबिन चारा

ज्वारीच्या योग्य वाढीसाठी खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. कोरडवाहू ज्वारीला हेक्टरी ६ टन तर बागायती ज्वारीला हेक्टरी १२ ते १८ टन शेणखत टाकावे.

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिक्स करून घ्यावे. पेरणीपूर्वी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र या प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. खताची मात्रा देत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. शेत तणविरहीत ठेवल्यास ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ झाल्याची दिसून येते. योग्य व्यवस्थापनात प्रति हेक्टरी ४५ ते ५० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

Jowar plantation for fodder purpose
जनावरांना मक्याचा चारा कशासाठी ?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com