Milk Dairy : जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनात वाढ

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (दूध पंढरी) दूध संकलनात वरचेवर वाढ होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला दूध संघ यामुळे सावरण्याच्या स्थितीत आहे.
Milk
MilkAgrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (दूध पंढरी) दूध संकलनात (Milk Collection) वरचेवर वाढ होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला दूध संघ यामुळे सावरण्याच्या स्थितीत आहे. सहा महिन्यांपूर्वी रोज केवळ १८ हजार लिटर संकलन असणाऱ्या संघाकडे आता जवळपास रोज ४६ हजार लिटरपर्यंतचे दूध संकलन होत आहे.

Milk
Milk Industry : दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रता आणणार

जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बहुतेक सर्व केंद्रांवर संकलन वाढले आहे. त्याशिवाय नव्याने सात मार्गही सुरू करण्यात आले आहेत. आपण पदभार घेतल्यापासून जाणीवपूर्वक दूध संकलनात वाढ करण्यावर भर दिला. तसेच प्रत्येक संचालकांना त्यांच्या भागातून किमान २००० लिटर दूध संकलन वाढ करण्यासाठी सुचवले.

Milk
Milk Dairy : परराज्यांतील दूध डेअरींविरोधात आघाडी

त्याशिवाय ‘गाव तेथे दूध डेअरी’ हा आमचा संकल्प आहे. त्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय दूध तपासणीसाठी अद्ययावत यंत्रणा, दुधाच्या गुणवत्तेनुसार दर आणि दर दहा दिवसांना दुधाचे पेमेंट द्यायला सुरुवात केली आहे. तसेच दुधाच्या गुणवत्तेत कोणताही मानवी हस्तक्षेप ठेवला नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक केल्याने आणि रोखीने व्यवहार होत असल्याने दूध उत्पादकांची विश्‍वासार्हता वाढली आहे. या सगळ्याचा परिणाम संकलनातील ही वाढ आहे.’’

केगाव, पंढरपूर, टेंभुर्णीत वाढ

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक केगावच्या संकलन शीतकरण केंद्रावर ११ हजार ८०० लिटर, त्यानंतर पंढरपुरात ८२०० लिटर, टेंभुर्णीत ८००० लिटर, सांगोल्यात १८०० लिटर, मोहोळला ६८०० लिटर, मंगळवेढ्यात ५४०० लिटर असे संकलन आहे.

दुधाच्या गुणवत्तेनुसार दर आणि वेळेवर पेमेंट याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संघाकडे दूध वाढते आहे. सध्या कर्जाच्या बोजाचा विषय आहे, पण मुंबई आणि शेटफळमधील संघाच्या जागा विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच संघावरील कर्जही कमी होईल.
रणजितसिंह शिंदे, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com