शेतीनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप कसे असते?

सन १९६७ सालापासून शेतीनिष्ठ पुरस्काराची सुरुवात झाली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुधारीत शेती अवजारांचा वापर करून पिकांची लागवड करणारे, जमिनीची मशागत करणारे शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
about shetnishth award
about shetnishth awardAgrowon
Published on
Updated on

सन १९६७ सालापासून शेतीनिष्ठ पुरस्काराची (agriculture award) सुरुवात झाली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुधारीत शेती अवजारांचा वापर करून पिकांची लागवड करणारे, जमिनीची मशागत करणारे शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पद्धतीचा अवलंब, विहीरी किंवा नाल्यामधील पाणी अडवून शेतीसाठी वापर करणारे शेतकरी. तुषार व ठिबक सिंचन पध्दतीने पाण्याचा सुयोग्य वापर करणारे. शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभुळ इत्यादींची लागवड करणे. स्वतःची कल्पक बुद्धी वापरून नवीन संकल्पनेतून पिकांची लागवड करणे, जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागती संदर्भात मार्गदर्शन करणे. शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे. इत्यादी गोष्टीं साध्य करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

about shetnishth award
संजय गांधी निराधार अनुदान योजना

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ शेतकऱ्यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com