Animal Infertility : जनावरांतील वंधत्व कसे ओळखाल?

जनावरे दिसायला जरी वरून व्यवस्थित दिसत असली तरी काही जनावरे पूर्णतः प्रजननास आणि गाभण राहण्यासाठी अयशस्वी ठरतात त्याला वांझपणा म्हणतात.
Animal Infertility
Animal InfertilityAgrowon
Published on
Updated on

जनावरे दिसायला जरी वरून व्यवस्थित दिसत असली तरी काही जनावरे पूर्णतः प्रजननास (Fertility) आणि गाभण राहण्यासाठी अयशस्वी ठरतात त्याला वांझपणा (Infertility) म्हणतात.

जनावरातील वंधत्वाची कारणे, प्रकार आणि उपाय काय आहेत, याविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया. 

Animal Infertility
Animal Care : जनावरांतील फऱ्या आजाराची लक्षणे कशी ओळखाल?

वंधत्वाचे प्रकार काय आहेत?

जनावरांतील वंधत्वामध्ये कायमचे वधत्व आणि तात्पुरते वंधत्व असे वंधत्वाचे दोन प्रकार आहेत. कायमचा वंधत्वामध्ये जननेंद्रियांच्या रचनात्मक दोषामुळे जनावर प्रजननास अकार्यक्षम ठरते.

तेव्हा त्याला कायमचा वांझपणा म्हणतात. हा उपचाराने बरा न होणारा वांझपणा असतो. तात्पुरत्या वंधत्वामध्ये जनावर माजावर न येणे.

मुका माज दाखविणे. गर्भधारणा न झाल्याने वारंवार उलटणे. गर्भधारणा होणे पण लगेच गर्भपात होणे अशी लक्षणे दिसतात. 

Animal Infertility
Animal Care : जनावरांतील जंतनिर्मूलन कसे कराल?

वंधत्वाची कारणे आणि उपाय काय आहेत?

जनावरांना संतुलित आणि पौष्टीक आहार द्यावा. जनावरांच्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ तसेच प्रथिनांचा समावेश असावा.

जनावरांना दररोज आहारातून ४० ते ५० ग्रॅम खनिज मिश्रणे द्यावीत. यासोबतच वाळलेल्या चाऱ्याचा अंतर्भाव करावा. शुद्ध व पुरेसं पाणी जनावरांना देणं आवश्यक आहे. 

लाळ्या - खुरकूत, क्षयरोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दुभती जनावरं अशक्त बनतात त्यामुळे जनावरांच्या वजनात दहा ते पंधरा टक्के घट होते.

परिणामी तात्पुरते वंधत्व येते. याकरिता लसीकरण हा उपाय आहे. गाई, म्हशी वाल्यानंतर त्यांचे गर्भाशय नियमित पूर्वस्थितीत येण्याच्या काळात, योग्य काळजी न घेतल्यास सूक्ष्मजंतूंचा योनीमार्गाद्वारे गर्भाशयात प्रवेश होतो.

त्यामुळे योनीमार्गावरील रोग गर्भाशयाचे सामान्य आजार होतात याकरिता गाई म्हशी विल्यानंतर त्यांना स्वच्छ जागी ठेवावे. गाई, म्हशींचा पार्श्वभाग जंतुनाशकाने योग्य प्रकारे धुवावा. गर्भाशयात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषध सोडून घेणे असे उपाय करावेत.

ब्रूसेलॉसिस, ट्रायकोमोनियासिस सारख्या रोगामुळे जनावरांत गर्भपात होतो. याकरिता गर्भपात झालेल्या जनावरांची तपासणी करून योग्य उपचार करावेत.

मायांग बाहेर येणे, गर्भाशयाला पिळ पडणे, प्रसुती सुलभ न होणे, वार न पडणे इत्यादी कारणांनी तात्पुरते किंवा कायमचे वंधत्व येते. याकरिता पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. माजं न ओळखणे, माजाच्या योग्य वेळी कृत्रीम रेतन न करणे.

अयोग्य वेळी कृत्रिम रेतन होणे इत्यादी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे तात्पुरते वंधत्व येऊ शकते. तरी या गोष्टी टाळाव्यात. वीर्यमात्रेची हाताळणी योग्य पद्धतीने न करणे, कृत्रिम रेतन करण्याचे कौशल्य नसणे या कारणांमुळेही जनावरांमध्ये वंधत्व येऊ शकते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com