पावसाळ्यात शेळ्यांना होते ‘या’ गवताची विषबाधा

पावसाळ्यात जनावरांना चरायला नेल्यानंतर त्यांना विविध गवतांची विषबाधा झालेली दिसून येते.
Grazing toxicity in animals
Grazing toxicity in animalsAgrowon

जनावरांना चरायला (grazing) घेऊन जाताना, मोकळ्या कुरणामध्ये चरताना जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. विशेषकरून पावसाळ्यात जनावरांच्या खाण्यात घाणेरीसारखी वनस्पती आल्याने, त्यांना विषबाधा (Poisoning) होत असते. विषबाधा झाल्याने जनावरांच्या यकृताला बाधा होऊन, कावीळसारख्या आजारांची बाधा होत असते.

पावसाळ्यात सर्वत्र गवतवर्गीय वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. चराऊ कुरणामध्ये घाणेरी, गुणगुणी या नावानी ओळखल्या जाणाऱ्या विषारी वनस्पती प्रामुख्याने आढळून येतात. चुकून जरी या वनस्पती जनावरांच्या खाण्यात आल्या तर त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते.

Grazing toxicity in animals
हिरव्या चाऱ्याचे योग्य प्रमाण महत्त्वाचे! | Green Fodder | ॲग्रोवन

घाणेरीतील लेंटाडीन नावाचा विषारी घटक ही वनस्पती खाल्ल्यानंतर जनावरांच्या रक्तामध्ये येतो. असे जनावर सूर्यप्रकाशात आल्यास त्यांना विषबाधेची लागण होत असते. या प्रकारच्या विषबाधेस प्रकाशसंवेदनशीलता असेही म्हटले जाते.

Grazing toxicity in animals
जनावरांसाठी द्विदल वर्गातील चारा पिके | Legume Fodder For Animals |Cowpea | ॲग्रोवन

यामध्ये जनावरांच्या त्वचेचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो. त्या भागाला सूज येते. त्या भागाला खाज सुटायला लागते. परिणामी जनावर झाडाला किंवा भिंतीला शरीर घासतात. डोळ्याच्या बाजूचा भाग, कान, नाक आणि शेपटीला सूज आलेली दिसून येते.जनावरांच्या डोळ्यातील श्लेष्मपटलाचा रंग पिवळा पडतो. जनावरांना पिवळ्या गडद पिवळ्या रंगाची लघवी होते. बाधा झालेल्या जनावराला ताप येतो. जनावरांचे खाणे-पिणे कमी किंवा बंद झाल्याने, पोटाची हालचाल मंदावते. शरीराला खाज सुटत असल्याने, शरीराचा जो भाग सतत घासला जातो, तेथील कातडी निघून जाते. विषबाधेची तीव्रता जास्त असल्यास, जनावर दगावण्याचीही शक्यता असते. पावसाळ्यात जनावरांमध्ये घाणेरी वनस्पतीची विषबाधा झाल्याचे प्रकार आढळून येतात.

यावर उपाय म्हणून, जनावरांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसून येत असल्यास, अशी जनावरे सूर्यप्रकाशापासून दूर, दाट सावलीमध्ये ठेवावीत. त्यामुळे जनावरांची सूज आणि खाज सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर उपचार करून, ही जनावरे सावलीमध्येच बांधावीत. औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत. योग्य आणि वेळेत उपचार केल्यास जनावरे लवकर बरी होण्यास मदत होते. पावसाळ्यात घाणेरी वनस्पती खाल्ल्याने मेंढ्या व बैल वर्गीय जनावरांमध्ये घाणेरीची विषबाधा आढळून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com