Fortified Milk : फोर्टिफाइड दूध

दूध हे उच्च दर्जाचे प्रथिने, कॅल्शिअम आणि फॅट विद्राव्य जीवनसत्त्व अ आणि ड चा समृद्ध स्रोत आहे. प्रक्रिया करताना दुधातील फॅट काढून टाकल्यास जीवनसत्त्व अ आणि ड नष्ट होतात.
Fortifide Milk
Fortifide MilkAgrowon

नारायण सरकटे

दूध हे उच्च दर्जाचे प्रथिने, कॅल्शिअम (High Protein and Calcium In Milk) आणि फॅट विद्राव्य जीवनसत्त्व अ आणि ड चा समृद्ध स्रोत आहे. प्रक्रिया करताना दुधातील फॅट (Fat In Milk) काढून टाकल्यास जीवनसत्त्व अ आणि ड नष्ट होतात. बऱ्याच देशांमध्ये दुधातून काढून टाकलेली जीवनसत्त्व परत जोडण्याची अनिवार्य तरतूद आहे, कारण ते सहज शक्य आहे.

भारतामध्ये जीवनसत्त्व अ आणि ड सह दुधाचे फोर्टिफिकेशन आवश्यक आहे. कारण त्याची लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. अलीकडील नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो (NNMB) सर्वेक्षण आणि आयसीएमआरच्या तज्ज्ञ गटाच्या २०१२च्या अहवालात असे नमूद केले आहे की भारतात जीवनसत्त्व अ आणि ड च्या कमतरतेचा भार खूप जास्त आहे. विशेषतः शहरी भागातील लहान मुले आणि प्रौढ दोघांमध्ये शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असतात आणि पुरेसा सूर्यप्रकाशही घेत नाहीत.

Fortifide Milk
Milk Rate : मुंबईत सुटे दूध विक्री दरात उद्यापासून सात रुपयांनी वाढ

दूध हा सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहे. जीवनसत्त्व अ आणि ड जरी विविध शारीरिक कार्यांसाठी महत्त्वाचे असले तरी दुधामध्ये नैसर्गिकरीत्या उपस्थित असतात. जेव्हा दुधावर प्रक्रिया केली जाते तेव्हा टोन्ड, डबल टोन्ड आणि स्कीम्ड दूध तयार होते.

Fortifide Milk
Milk rate: या घटकांचा दुधातील स्निग्धपदार्थावर होतो परिणाम

प्रक्रिया स्तरावर, भारतात सामान्यतः चार प्रकारचे द्रव दूध तयार केले जाते: फोर्टिफाइंग स्टँडर्डाइज्ड (फॅट ४.५%), टोन्ड (फॅट - ३%), डबल टोन्ड (फॅट १.५%) आणि स्किम्ड दूध (फॅट <०.५%) जीवनसत्वासह. जीवनसत्त्व अ आणि ड हे सुनिश्‍चित करतात, की ते कमी फॅटयुक्त दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील. जीवनसत्त्वांच्या त्यांच्या दैनंदिन गरजा पुरतील.

दूध फोर्टिफिकेशन करण्याचे तंत्रज्ञान सोपे आहे. दुधात जोडता येणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे कोरड्या पावडरच्या स्वरूपात तसेच द्रव स्वरूपात उपलब्ध आहेत. चरबी-विद्राव्य जीवनसत्त्वे तेलकट तसेच पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपातही उपलब्ध आहेत.

- नारायण सरकटे,

७५८८६४९२९६

(सहायक आयुक्त (अन्न) तथा पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com