Animal care : गाई, म्हशींमध्ये आनुवंशिक सुधारणा महत्वाची...

गाय व वळू हे दोन्ही उत्तम प्रतीचे असल्यास मिळणारी संतती उत्तम गुणवत्ताधारक मिळते. आजमितीला कृत्रिम रेतन पद्धतीने सिद्ध वळूचे वीर्य सर्वच शासकीय पशू दवाखान्यात उपलब्ध असते.
Animal care
Animal careAgrowon

डॉ. प्रवीण बनकर

सामान्यतः कृत्रिम रेतनासाठी (Artificial Retan) उपलब्ध वीर्यमात्रेत (Semen) जे शुक्राणू असतात,त्यामध्ये X किंवा Y दोन्ही रंगसुत्रे असतात. बिजांड आणि शुक्राणू यांच्या फलनातून भ्रूण आकाराला येत असते. सर्व बिजांड ही X गुणसूत्र धारक असतात. जेव्हा X रंगसूत्र धारक शुक्राणू बिजांडसह मिलन पावतात तेव्हा XX म्हणजे मादी (कालवड) जन्माला येते. जेव्हा Y रंगसुत्रे धारक शुक्राणू बिजांडसह मिलन पावतात तेव्हा XY म्हणजे नर (गोऱ्हा) जन्माला येतो. कृत्रिम रेतन केल्यावर कालवड व्हावी ही अपेक्षा अनेक पशुपालकांना असते मात्र बिजांड कुठल्या (X किंवा Y) रंगसूत्रे धारक शुक्राणूसह मिलन करतो आहे ही नैसर्गिक प्रक्रिया असते.

Animal care
Animal Care : बैलांमधील खांदेसुजीवर उपाययोजना

गाय व वळू हे दोन्ही उत्तम प्रतीचे असल्यास मिळणारी संतती उत्तम गुणवत्ताधारक मिळते. आजमितीला कृत्रिम रेतन पद्धतीने सिद्ध वळूचे वीर्य सर्वच शासकीय पशू दवाखान्यात उपलब्ध असते. वस्तूस्थितीनुसार, एक गाय तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त १० ते १२ वेळा वासरांना जन्म देऊ शकते. मात्र वळूपासून वीर्य संकलन करून ते कृत्रिम रेतनासाठी वापरले तर एक वळू असंख्य कालवडींचा / वासरांचा ‘पिता’ होऊ शकतो. म्हणूनच वळूमधील जनुकीय किंवा आनुवंशिक सुधारणा अधिक महत्त्वाची असते.

Animal care
Animal Care : गाई,म्हशींतील अनुवंशिक सुधारणा का महत्त्वाची?

एक वळू एकावेळी सरासरी ४ मिलि वीर्य देतो. एक मिलि विर्यापासून सरासरी ४० रेतन डोस मिळतात. यशस्वी फलनासाठी एका डोसमध्ये सरासरी ३० दशलक्ष शुक्राणू असावे लागतात. यावरून एका वळूपासून एकावेळी मिळालेल्या वीर्यापासून साधारण १५० ते २०० गायींचे रेतन करता येते. म्हणूनच आनुवंशिक सुधारणेत वळू हा केंद्रस्थानी असतो. मात्र त्याचबरोबर गायीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्तम गायीची निवड करण्यासाठी तिच्यापासून प्राप्त कालवडीच्या उत्पादन क्षमतेचाही विचार करावा लागतो. यासाठी आपल्याजवळील पशुधनाच्या मूलभूत बाबी तसेच उत्पादनाच्या नोंदी ठेवणे सुद्धा आवश्यक आहे.

आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम

भारतात स्वातंत्र्यापूर्वीच काही अंशी जनावरांतील आनुवंशिक सुधारणेची मुहूर्तमेढ पाटणा (बिहार) येथे विकसित ‘टेलर’ संकरित गायीच्या माध्यमातून झाली आहे. स्वातंत्र्यानंतरही पंचवार्षिक योजनेद्वारे एकात्मिक गोवंश विकास प्रकल्प, दूध महापूर योजना इत्यादी अनेक उपक्रमांद्वारे विविध जातिवंत गाईंमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर देशी गायींचे व इतर देशी जनावरांचे नोंदणीकरण व संवर्धन, संकरीकरण, कृत्रिम रेतन केंद्रांची स्थापना अशा उपक्रमातून विविध पातळीवर सुधारणा करण्यात आल्या आहेत.

विविध जनावरांच्या जाती आणि त्यांच्या गुणवैशिष्ठ्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘राष्ट्रीय पशुअनुवांशिकी संशोधन ब्युरो (NBAGR) ही संस्था कर्नाल(हरियाना) येथे स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्र कर्नाल, राष्ट्रीय म्हैस संशोधन केंद्र , हिस्सार येथे आहे. याच बरोबर जैवतंत्रज्ञान शास्त्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने (भृणप्रत्यारोपण, इटीटी) जनावरांच्या आनुवंशिक सुधारणेस गती मिळाली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तर्फे अकोल्यातील पूर्णाथडी म्हैस आणि बाएफ, पुणे तर्फे कठानी गोवंशाची नोंदणी करण्यात आली आहे. आनुवंशिक सुधारणा समजून घेताना देशी पशुधनाचा वारसा माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

आनुवंशिक सुधारणा पद्धती

आपल्याकडील जनावरे ही विविध जातींची असतात. उदा. देशी, विदेशी, संकरित. आपण ज्यांना देशी संबोधतो त्यातही जातिवंत, अर्धसंकरीत, गावरान अशी वर्गवारी केली जाते. उदा. गीर, सहिवाल, खिल्लार, गवळाऊ हे देशी गोवंश आहेत. जर्सी, होल्स्टिन फ्रिजियन या विदेशी गायींच्या जाती आहेत. देशी गायींमध्येही महाराष्ट्रात गवळाऊ, खिल्लार, डांगी, देवणी, लाल कंधारी,कोकण कपिला अशी जातिवंत जनावरे आहेत. जसे खिल्लारची उंची व शिंगांची ठेवण आणि त्याचबरोबर प्रत्येक जातींचा बाह्यरंग अशी गुणवैशिष्टे पाहायला मिळतात.

प्रत्येक जनावरांच्या जातीचे गुणवैशिष्टे त्यांच्यातील विविध जनुके नियंत्रित करीत असतात. आनुवंशिक पातळीवर सुधारणा करण्यासाठी विशिष्ट गुणधर्मधारक जनावरांचा संकर करून किंवा एखाद्या जातिवंत जनावरांचा उत्पादनक्षमतेचा विकास करण्यासाठी त्या जातिवंत जनावरांमध्ये निवड पैदास पद्धतीचा अवलंब केल्यास होणारी पिढी पाहिजे त्या उत्पादनक्षमताधारक गुणधर्मांनी संपन्न असेल.

जातिवंत जनावरांच्या अंगभूत गुणधर्मांचे संवर्धन होण्यासाठी आपण त्यांचे संकरीकरण टाळतो. मात्र जी जनावरे गावठी/ गावरान किंवा शास्त्रीय भाषेत अवर्गीकृत या गटात मोडतात, त्यांच्यातील गुणधर्म कुठल्याच जातिवंत जनावरांशी जुळून येत नाहीत आणि त्याचबरोबर ज्यांची उत्पादनक्षमतासुद्धा खालावलेली असते, अशा गटातील जनावरांसह उत्पादनक्षमता अधिक असलेल्या जर्सी, होल्स्टिन फ्रिजियन गायी यांच्यासोबत संकरीकरण या पद्धतीचा अवलंब करावा.

म्हशीमध्ये पत सुधारणा ही पद्धत अवलंबिली जाते. पत सुधारणा पद्धतीत गावठी म्हशींचा इतर स्थापित जातींच्या म्हशीसोबत संकर केला जातो, जेणेकरून पुढील पिढीत स्थापित जातीच्या म्हशींचे अर्धे गुणधर्म आढळतील.

- डॉ. प्रवीण बनकर,

९९६०९८६४२९, ( सहाय्यक प्राध्यापक , पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com