Azolla : जनावरांसाठी पूरक पशुखाद्य : ॲझोला

जनावरांसाठी चारा ही महत्त्वाची गरज आहे. जरी जनावरांना बाजारातून पशुखाद्य दिले जात असले तरी, ताजे हिरवे गवत किंवा कोरडे पेंढा आवश्यक आहे कारण चारा उपलब्धतेमुळे पशुखाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Azola
AzolaAgrowon

जनावरांसाठी चारा (Fodder For Animal) ही महत्त्वाची गरज आहे. जरी जनावरांना बाजारातून पशुखाद्य (Animal Feed) दिले जात असले तरी, ताजे हिरवे गवत (Green Fodder Grass) किंवा कोरडे पेंढा आवश्यक आहे कारण चारा उपलब्धतेमुळे पशुखाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. दुग्धोत्पादनाच्या (Milk Production) खर्चात वाढ न करता दुग्धोत्पादन वाढवणे खूप महत्त्वाचे असते. घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य खुराक म्हणून ॲझोलाचा (Azola Use As A Animal Supplement Feed) वापर शक्य आहे.

Azola
पशुखाद्य तयार करण्यासाठी फॅमिली फीड मिलर

१)ॲझोलाचा वापर प्रामुख्याने भात शेतीमध्ये जैविक खत (नत्र स्थिरीकरणासाठी) केला जातो. त्यामुळे जमिनीची पोत सुधारून भात उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते.

२) ॲझोलामध्ये २५ ते ३० टक्के पर्यंत प्रथिने आहेत. जनावरांच्या पोषणासाठी आवश्यक असलेली अमिनो आम्ल (विशेषतः लाइसिन) आहे. तसेच जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण चाऱ्याच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे ॲझोला जनावरांसाठी सर्वात आर्थिक आणि कार्यक्षम खाद्य पर्याय आहे. विशेषत: उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्यामुळे ॲझोला जनावरे सहजपणे पचवू शकतात. त्यामुळे याचा वापर पशुखाद्यास पूरक म्हणून करता येतो.

३) कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते.

Azola
घरच्या घरी कमी खर्चातील पशुखाद्य निर्मिती । Cattle Feed Preparation

पोषक घटक

प्रथिने(शुष्क वजन आधारित) : २५-३०%

कॅल्शिअम : ६७ मिलिग्रॅम /१००ग्रॅम

लोह : ७.३मिलिग्रॅम /१००ग्रॅम

जीवनसत्त्व,खनिजे : १०-१५%

नत्र : ५%

अमिनो आम्ल : ४-१०%

ॲझोलाचे उत्पादन ः

१. झाडाच्या सावलीत पण भरपूर सूर्यप्रकाश देणाऱ्या जागेत किंवा ५० टक्के शेडनेटचा वापर करून जमिनीत २ मीटर लांबी, २ मीटर रुंद आणि १२ इंच खोल असा खड्डा खणावा.

२. खड्ड्याचा पृष्ठभाग समप्रमाणात करून घ्यावा. सर्व ठिकाणी पाण्याची पातळी सारखी राहील. यानंतर या खड्ड्यात सिल्पोलीन प्लास्टिक कागद आच्छादून घ्यावे. प्लास्टिक पेपर व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. त्यासाठी प्लास्टिक कागदावर सर्व बाजूंना विटांचा थर लावावा.

३. तयार झालेल्या खड्ड्यात प्रथम १० ते १५ किलो सुपीक चाळलेली माती पसरून घ्यावी. यानंतर ५ किलो कुजलेले शेण आणि ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात चांगले मिसळून खड्ड्यात मातीच्या थरावर एकसारखे पसरून ओतावे. यानंतर खड्ड्यात १०सेंमी एवढे पाणी भरावे.एक दिवस असेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी या खड्ड्यात १ किलो ताजे आणि शुद्ध अझोला कल्चर सोडावे.

४. ८ ते १० दिवसामध्ये पूर्ण वाढ होऊन खड्डा ॲझोलाने भरून जातो.

ॲझोलाचे फायदे ः

१. दुग्ध उत्पादनात १०-१२ टक्के वाढ होते. दुधाची गुणवत्ता सुधारते.

२. पशुखाद्य खुराकावरील १५ ते २० टक्के खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते.

३. कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात अझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते.

४.यामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्यामुळे जनावरे सहजपणे पचवू शकतात.

५. उत्पादन खर्च अत्यंत कमी असून, त्यातुलनेत उत्पादन अधिक आहे.

६. कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. उत्पादनासाठी लागणारी गुंतवणूक कमी आहे.

८. अझोलाच्या बेडमधून काढण्यात आलेले पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी पोषक असते.

ॲझोला उत्पादन घेताना काळजी ः

१. निवडलेली जागा सावलीत आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळणारी असावी.

२. खड्ड्यातील पाण्याची पातळी १० सेंमीच्या खाली नसावी.

३. दर १० दिवसांनी खड्ड्यातील २५-३० टक्के पाणी काढून नवीन ताजे पाणी खड्ड्यात भरावे. त्यामुळे नायट्रोजनची वाढ होण्यापासून बचाव होईल.

४. वाळवी, मुंग्या, किडे यांपासून बचाव करावा.

५. वाढ चांगली होण्यासाठी दर ८ दिवसांनी १ किलो शेण आणि ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून मिसळावे.

६. दर ३० दिवसांनी खड्ड्यातील माती ५ किलो ताज्या सुपीक मातीने बदलावी.

७. सहा महिन्यांनी बेड स्वच्छ करून नवीन ॲझोला लावावा.

८. कीटक आणि रोग आढळून आल्यास नवीन बेड तयार करून त्यात ॲझोलाचे शुद्ध कल्चर टाकावे.

ॲझोला जनावरांना देण्याची पद्धत आणि प्रमाण ः

१) जनावरांना ॲझोला खाऊ घालायच्या आधी तो स्वच्छ धुवावा. जेणेकरून शेणाचा वास निघून जाईल.

२) सुरवातीला एक आठवडा जनावरांना ॲझोला देताना पशुखाद्यात १:१ प्रमाणात मिसळून द्यावा. नंतर पंधरा दिवसांनी पशुखाद्यात न मिसळता नुसता ॲझोला जनावरांना (१ ते १.५ किलो प्रति दिन एका जनावरांसाठी) खायला द्यावा.

संपर्क : डॉ.के.एस.शिंदे, ९००४६२३६४९

(डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे, कोल्हापूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com