Goat Diseases : शेळ्यांमधील रोगाला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

Goat Farming : आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेळीपालन व्यवसायाची संकल्पना दिवसेंदिवस शेळीपालकाकडून आत्मसात करण्याबाबतचा सकारात्मक प्रतिसाद वाढत आहे. परंतु यामध्ये रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.
Goat Disease
Goat DiseaseAgrowon

Goat Rearing : आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेळीपालन (Goat Farming) व्यवसायाची संकल्पना दिवसेंदिवस शेळीपालकाकडून आत्मसात करण्याबाबतचा सकारात्मक प्रतिसाद वाढत आहे. परंतु यामध्ये रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

याकरिता वेळोवेळी रोग निदानात्मक चाचण्या पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने सांसर्गिक गर्भपात, जोन्स डीसिज, कोक्सीडीओसिस, लेंडी नमुने तपासणी इ. चाचण्या करून त्यानुसार रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास  याचा निश्चितच फायदा शेळी पालकांना होऊ शकतो.

करडांमधील आजार

 जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये शेळ्यांच्या करडांचा वजन वाढीचा वेग जास्त असतो. या काळामध्ये करडे फक्त दुधावर जोपासली जातात.

परंतु शेळ्यांना दूध कमी असल्यास किंवा एकापेक्षा जास्त पिल्ले असल्यास पिल्लांना दूध कमी मिळते.

त्यामुळे पिल्लांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. पिल्लांचे वजन योग्य प्रमाणात मिळत नाही.याकरिता करडांच्या दुधामध्ये मिल्क रीप्लेसरचा वापर केल्यास पिलांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होऊन पिल्ले आजारी पडण्याचे व  मरतुकीचे प्रमाण कमी करू शकतो.  

Goat Disease
Goat Diseases : शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर आजाराची लक्षणे ओळखा

शेळ्यांतील जंत प्रतिबंध   

जंत प्रादुर्भावामुळे शेळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन उत्पन्नामध्ये घट होत असते. याकरिता जंत प्रतिबंधक औषधोपचार शेळीपालक करतात, परंतु ऋतुनुसार विशिष्ट जंत प्रादुर्भाव होत असतो.

त्यानुसार त्यावर प्रभावी असे जंतप्रतिबंधक औषध वापरणे आवश्यक आहे. तसेच जंतप्रादुर्भावाची तीव्रता चाचणी (इपीजी टेस्ट) करून जंतप्रतिबंधक औषधोपचाराच्या आवश्यकतेनुसार व जंताच्या प्रकारानुसार जंतनाशक औषध पाजणे कधीही फायदेशीर  ठरते.

 लसीकरण  वार्षिक वेळापत्रकानुसार देवी, आंत्रविषार, घटसर्प, पीपीआर, लाळ्या-खुरकूत, नीलजिव्हा, धनुर्वात या रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वेळापत्रकानुसार करावे. लसीची शीतसाखळी खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com