

Deworming : जंतामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण नगण्य असल्याने जंतांच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष होते. जनावरांमध्ये जंत प्रादुर्भाव (Worm Infestation) झाल्यास विशेषतः पावसाळा, हिवाळा ऋतूमध्ये ठरावीक कालांतराने जंतनाशकाची मात्रा दिली जाते. विशेषतः शेळी-मेंढीमध्ये सातत्याने जंतनिर्मूलन करावे लागते.
कारण त्यांच्यामध्ये नियमितपणे जंताचा प्रादुर्भाव होतो.जनावरांच्या शरीरामध्ये प्रामुख्याने गोलकृमी जंत, पट्टिका कृमी जंत, चपटकृमी किंवा पर्णकृमी जंत आढळून येतात. जंत लक्षणीय प्रमाणात जनावराच्या शरीराला हानी पोहोचवत असतात, परंतु अशी लक्षणे बहुदा सौम्य असतात.
गंभीर लक्षणे निर्माण न करणाऱ्या परोपजीवी आजाराकडे मात्र आपले लक्ष वेधले जात नाही. जनावरामध्ये जंताचा प्रादुर्भाव झाल्यास कोणती लक्षणे दिसतात या विषय़ीची माहिती पाहुया.
जंत प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये आढळणारी लक्षणे
- जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावर रोज थोडे थोडे खंगत जात असते. दुबळे व अशक्त होते.
- जनावराचे वजन, दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोग प्रतिकारशक्ती अतिशय कमी होत जाते.
- जनावराची भूक मंदावते आणि जनावर चारा कमी खाते.
- दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वीस ते तीस टक्के उत्पादन कमी होते.
- जनावरांची कातडी रबरासारखी निस्तेज खडबडीत निबर होते.
- जनावरांचे केस राठ उभे राहतात. मोठ्या प्रमाणात केस गळती वाढते.
-
लहान जनावरांमध्ये अतिसार सुरू होतो. बाधित जनावरांची विष्ठा/शेण पातळ होते. शेणाला नासक्या अंड्यासारखा वास येतो.
- शेळ्या, मेंढ्या, जनावरांमध्ये जबड्याच्या खालच्या बाजूला कातडीखाली पाणी साचून सूज येते.
- म्हशीच्या पारडीमध्ये मातकट रंगाची चिकट विष्ठा तयार होऊन संपूर्ण गोठ्यामध्ये दुर्गंधी पसरलेली असते.
- वासरे अशक्त होऊन खंगत जातात आणि त्यांची वाढ खुंटते. रेड्यामध्ये जंतांच्या बाधेमुळे मरतुकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या अतिशय जास्त आढळून येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.