
Animal Poisoning : सध्या पाऊस नाहीए. त्यामुळं चारा नाही. म्हणून जनावरांच्या खाण्यात नको ते विषारी गवत जातात. या विषारी वनस्पतींपैकी एक म्हणजे गाजर गवत त्याला आपण कॉंग्रेस गवत म्हणून पण ओळखतो. हे तण जनावरांनी खाल्ल तर त्यांना विषबाधा होऊ शकते. याचा परिणाम म्हणजे दूधही कडू लागत. मग आपल्या जनावरांन हे गवत खाल्लय हे कस ओळखायच ? आणि त्यावर काय उपाय करायचे हे आम्ही तुम्हाला काही तज्ज्ञांच्या मदतीने सांगत आहोत.
गाजर गवताच्या परागकणांमुळे मानसामध्ये आणि जनावरांनाही विविध प्रकारची ॲलर्जी होते. गजरगवताचा कडवट व विशिष्ट असा घाण वास येतो. आता आपल्या जनावराने गाजर गवत खाल्लय हे कसं ओळखायच? तर जनावरांच्या खाण्यात गाजर गवत आल तर अंगावर विविध ठिकाणी जखमा होऊन खपली बसते. मान व खांद्याच्या भागावरील केस जातात. त्वचा पांढरी पडते. पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूभोवती खाज येते. याशिवाय जनावराला अतिसार होऊन आंगाला सूज येते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची हि शक्यता असते. फक्त जनावरच नाही तर आपल्यालाही याचा धोका आहे कारण, गाजरगवतातील थोडा भाग दूधामध्ये सुद्धा उतरतो. त्यामुळे अशा जनवराच दुधही कडवट लागत.
त्यामुळे जनावराच्या चाऱ्यात गाजर गवत म्हणजे काँग्रेस येणार नाही याची काळजी घ्या. जर काळजी घेऊनही जनावराने गाजर गवत खाल्लच तर, काय उपचार करायचे? तर, विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास, जनावराला लवकरात लवकर पशुवैद्यकाला दाखवा. जनावराला तुळस, मेथी दाण्याचे पाणी पाजा. जनावराला थोड्या प्रमाणात लसूण खाऊ घालावा. लसूण खाण्यामुळे पोट दुखण्याची समस्या तसेच जुलाब कमी होतात. विषबाधा टाळायची असेल तर विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरायला सोडू नका. जनावराला जास्त वेळ उपाशी ठेऊ नका, नाहीतर काय होत, इथल गवत संपल म्हणून बंदावरच काँग्रेस खायला जनावर जायला लागतील. पण ते गेले नाही आणि तुम्ही चारा कापताना विषारी गवत चाऱ्यामध्ये आलं तरीही धोकाच आहे. त्यामुळं गवत कापताना लक्ष असू द्या. आपल्या पशुधनाची काळजी घ्या, म्हणजे ते हि आपल्या कामाची नीट काळजी घेऊ शकतील. आम्ही तुम्हाला असच व्यायलेल्या जनावराला काय खायला द्याव आणि काय देऊ नये हे सांगणारा व्हिडीओ पण बनवला होता तो तुमच्या स्क्रीनवर लाल असेल, तो हि नक्की बघा. आणि ऍग्रोवन ला सब्स्क्राईब केल नसेल तर आज करून टाका.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.