माशांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?

सध्याच्या मानवी जीवनशैलीचा विचार केल्यास, संतुलित आहार महत्त्वाचा आहे. या संतुलित आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्धपदार्थ, जीवनसत्त्वे यांचा समावेश असला पाहिजे. आपल्या भारतीय आहारात प्रामुख्याने प्रथिनांची कमतरता दिसून येते. ही प्रथिनांची गरज भरून काढण्यासाठी मासे एक चांगला पर्याय होऊ शकतो.
different breeds of fish from india
different breeds of fish from india
Published on
Updated on

माशांमध्ये १० ते २० टक्के प्रथिने असतात.१ ते ९ टक्क्यापर्यंत स्निग्ध पदार्थ आणि १ ते ३ टक्क्यापर्यंत पिष्टमय पदार्थ असतात. त्यामुळे मासे एक पौष्टिक आहार बनू शकतो. भारतातील माशांचा दरडोई वापर हा ७ किलो प्रतिवर्ष आहे.

कटला - कटला माशाचे डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग रुंद व फुगीर असतो. तोंड वरच्या बाजूला वळलेले असते. या माशांना मिशा नसतात. हा मासा पाण्याच्या वरच्या स्तरात वास्तव्य करून तेथील अन्न खातो. त्यामुळे इतर माशांशी अन्नासाठी स्पर्धा करीत नाहीत.

रोहू –या माशाचे शरीर लांब व प्रमाणबद्ध असते. या माशाचे तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेले असते. खवल्यांचा रंग लाल असतो. एका वर्षात ७०० ते ८०० ग्रम वजन मिळते. हा मासा पाण्याच्या मध्यभागी वास्तव्य करतो.

मृगळ- या माशाचे शरीर अधिक लांब असते. हा मासा पाण्याच्या तळाशी असते. खालच्या भागातील वनस्पती, प्लवंग खाऊन स्वतःचे पालनपोषण करतात. वर्षाला ६५० ते ७०० ग्रम पर्यंत वजन मिळते. हा मासा दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com