ही आहेत कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये

कोकण कन्याळ जातीची शेळी महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात आढळून येते.
Konkan kanyal goat breeds
Konkan kanyal goat breedsAgrowon
Published on
Updated on

कोकण कन्याळ (konkan kanyal) जातीची शेळी (goat) महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात आढळून येते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने (Dr. BSKKV) विकसित केली आहे.

कोकण कन्याळ ही वेगळी जात म्हणून नॅशनल ब्युॅरो आॅफ अॅनिमल जेनेटिक सिसोर्सेसमध्ये (NBPGR) २०१२ मध्ये नोंद करण्यात आली आहे. कोकण कन्याळ शेळी प्राधान्याने मांसासाठी वापरली जाते.

Konkan kanyal goat breeds
पशुधनाचा विमा का काढावा ?

कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये-

- या शेळयांचा रंग काळा (BLACK) असताो.

- शेळयांच्या तोंडावर व कानावर पांढऱ्या रंगाच्या पट्टया असतात.

- चेहरा चपटा व लांबट असतो व पाय लांब असतात.

- या शेळीच्या जातीचे वजन ३० ते ३५ किलो असते.

- या शेळया वर्षाला एक वेत देतात.

- या शेळीमध्ये जुळे होण्याचे प्रमाण ६६ टक्के आहे.

- कोकण कन्याळ ही जात मांस उत्पादनासाठी पाळली जाते.

- पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते.

- करडांचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते.

- एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com