Animal Castration : बेरड वळूच्या खच्चीकरणाचे फायदे काय आहेत?

गुणवत्तापूर्ण पशु पैदास घडवून आणण्यासाठी नर वासरांच योग्य वयात खच्चीकरण करण गरजेच आहे. कळपात असणारे नर किंवा वळू वयात आलेल्या पण शारीरिक वाढ पूर्ण न झालेल्या मादी वासरांना गाभण करू शकतात. हे टाळण्यासाठी खच्चीकरण आवश्यक आहे.
 Animal Castration
Animal CastrationAgrowon
Published on
Updated on

गुणवत्तापूर्ण पशु पैदास घडवून आणण्यासाठी नर वासरांच योग्य वयात खच्चीकरण (Animal Castration) करण गरजेच आहे.

कळपात असणारे नर किंवा वळू वयात आलेल्या पण शारीरिक वाढ पूर्ण न झालेल्या मादी वासरांना गाभण (Pregnant) करू शकतात.

हे टाळण्यासाठी खच्चीकरण आवश्यक आहे. खच्चीकरणाविषयी महाराष्ट्र पशू संवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया. 

कळपातील नर जनावराच खच्चीकरण जर केल नसेल तर प्रजनन काळात कळपातील जनावरांवर तसच पशुपालकांवर नर जनावरं हल्ला करण्याचा संभव असतो.

खच्चीकरण केल्यामुळे हा धोका कमी होतो. तसंच नर जनावराला हाताळणंही सोपं जातं. खच्चीकरण केल्यामुळे कळपातील जवळच्या नात्यात असणाऱ्या नर्व मादीमध्ये संकर होत नाही व इनब्रीडिंग (Inbreeding) टाळता येतं.

 Animal Castration
Animal pregnancy : प्रेगनन्सी किटचे फायदे काय आहेत? | ॲग्रोवन

खच्चीकरणामुळे नर वासराची शारीरिक वाढ जोमाने होते व विक्री योग्य वजन कमी काळात मिळत.

खच्चीकरण केलेल्या बोकडांच्या मांसाला उग्र वास येत नसल्यामुळे मांसाची मागणी वाढते.

बेरड वळूच खच्चीकरण केल्यास कृत्रिम रेतनाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीन मादीच्या जातीला व प्रकाराला अनुसरून पैदाशीच नियोजन करता येतं.

जे नैसर्गिक रितनामध्ये प्रत्येक वेळी शक्य होईलच असे नाही. 

 Animal Castration
Animal Shelter : मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे काय आहेत ? | ॲग्रोवन

जनावरांच्या खच्चीकरणाची पद्धत 

जनावरांच खच्चीकरण दोन पद्धतीन केल जातं. पहिली चिमटा पद्धत आणि दुसरी रबर बँड पद्धत. यात चिमटा पद्धत योग्य समजली जाते. चिमटा पद्धतीत बर्डीझो कॅस्ट्रेटर नावाचा चिमटा वापरला जातो.

खच्चीकरण पशुवैद्यकाकडूनच करावं. खच्चीकरण करताना व खच्चीकरणानंतर जनावरांना होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी स्थानिक भाग बधीर करून खच्चीकरण केलं जातं.

लोकल अॅनेस्थेशियाची इंजेक्शन, स्प्रे, जेली इत्यादींचा वापर करून स्थानिक भाग बधिर केला जातो. तसच खच्चीकरणानंतर जनावरांना वेदनाशामक औषधी देण्यात येतात.

त्यामुळ जनावरांना वेदना होत नाहीत. शासकीय नियमावलीत ठराविक वयाची नर वासरे खच्चीकरण करून घेण्याची सक्ती पशुपालकांना करता येते.

काही पैदाशीची वासरे परवाना असलेल्या पशुपालकांकडे विना खच्चीकरण सांभाळता येतात. मात्र अशा नर वासरांची तपासणी करण्याचे अधिकार पशुवैद्यकांकडे सुरक्षित आहेत.

परवानाधारकाचा वळू सदोष आढळल्यास परवाना रद्द करून वळूच खच्चीकरण करण्याचा अधिकार पशुवैद्यकांना देता येतात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com