

शास्त्रीय पद्धतीने कोंबडीचे पालन (poultry farming) करण्यासाठी कोंबड्यांचे वेळेवर लसीकरण करणे गरजेचं आहे. कुक्कुटपालन व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास चांगला फायदा दिसून येईल. या व्यवसायात कोंबड्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करणे गरजेचं ठरते. कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले (poultry chicks) शेडवर आणल्यानंतर त्यांच्यावर प्रवासाचा अतिरिक्त ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी त्यांना एक ग्रॅम इलेक्ट्रॉल पावडर (Electrol powder) एक लिटर पाण्यात टाकून द्यावी
दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत अॅन्टीबायोटीक एक ग्रॅम एक लिटर पाण्यातून द्यावी.
पाचव्या ते सहावी दिवशी बी-कॉम्पलेस २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
सातव्या दिवशी लासोटा लस, कोंबड्यांना एक थेंब डोळ्यात किंवा नाकातून द्यावी.
त्यानंतर चौदाव्या व पंधराव्या दिवशी गंबोरा लस १ थेंब डोळ्यात किंवा नाकात द्यावी.
पंचविसाव्या दिवसापासून तिसाव्या दिवसापर्यंत लिव्हर टॉनिक २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
४५ ते पन्नासाव्या दिवशी लिव्हर टॉनिक २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.