Texas Dairy Farm Explosion : अमेरिकेतील स्फोटात १८ हजार गायींचा दुर्दैवी मृत्यू

डिमीट साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये किती गायी मृत्यूमुखी पडलेल्या आकडेवारी वाढ होत आहे.
Dairy Farm Fire
Dairy Farm FireAgrowon

Dairy Farm Fire : अमेरिकेतील टेक्सास मध्ये एका भयंकर स्फोटात १८ हजार गायींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, टेक्सास शहरात काळे धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक तास मदत कार्य सुरू होतं.

न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, डिमीट साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये (South Fork Dairy) सोमवारी हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये किती गायी मृत्यूमुखी पडलेल्या आकडेवारी वाढ होत आहे.

माध्यमांच्या मते, २० हजारहून अधिक गायींचा मृत्यू या स्फोटात झाल्याची शक्यता आहे. टेक्सासमधील अग्निशामन अधिकारी स्फोटाच्या कारणाची तपासणी करत आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, स्फोटामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

Dairy Farm Fire
Import Of Dairy Products : दुग्धजन्य पदार्थ आयातीबाबत केवढी ही तत्परता

आगेची दाहकता भयानक होती. त्यामुळे गायींना फार्ममधून बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे १८ हजार गायींचा जळून मृत्यू झाला. यामध्ये होल्स्टीन आणि जर्सी गायींची संख्या अधिक होती. इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा आहे.

दरम्यान, टेक्सासमध्ये विविध घटनांमध्ये जनावरांच्या मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. २०१६ तर बर्फाच्या वादळात टेक्सासमध्ये तब्बल ३५ हजार दुभत्या गायींचा मृत्यू झाला होता. तर २०१७ मध्ये अमेरिकेतील कैलिफोर्नियामध्ये जंगलातील वणव्यात जनावरांचा मोठा कळप गमवाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com