Animal Care : कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी ही माहिती आवश्यक

जनावरामध्ये कृत्रिम रेतन करताना यशस्वी गर्भधारणेसाठी पशुपालकाला माजा वरील गाई म्हशी बाबत वंश, वय, दूध उत्पादन क्षमता माजाचा कालावधी आणि माजा ची लक्षणे माहीत असावी.
 Artificial Incimination
Artificial InciminationAgrowon
Published on
Updated on

जनावरामध्ये कृत्रिम रेतन (Artificial Incimination) करताना यशस्वी गर्भधारणेसाठी पशुपालकाला माजा वरील गाई म्हशी बाबत वंश, वय, दूध उत्पादन क्षमता माजाचा कालावधी आणि माजा ची लक्षणे माहीत असावी. पशुपालकाकडून माजावरील जनावरा संबंधित प्रश्न, प्रजननाच्या नोंदी लिखित स्वरूपात उपलब्ध असाव्यात. याशिवाय 

कृत्रिम रेतन करताना कोणत्या गोष्टी माहित असाव्यात याविषयी पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया.

 Artificial Incimination
कृत्रिम रेतन करूनसुद्धा गाय गाभण का राहत नाही?

योग्य प्रकारे पशुव्यवस्थापन आणि संतुलित आहार पुरवल्या जाणाऱ्या पशुधनास कृत्रिम रेतन तंत्राचा वापर अपेक्षित असतो.

जनावराचा माज ओळखण्याची जबाबदारी पशुपालकाची असते. माज ओळखण्याची क्षमता व अचूकता वाढवण्याचे प्रयत्न पशुपालकांनी करावेत. 

मुक्त संचार पद्धतीत माजा वरील जनावरे सहज निदर्शनास येतात तर बांधलेल्या जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी व संध्याकाळी नियमित बारकाईने निरीक्षण आवश्यक असते. 

प्रसूतीनंतर गाई साधारण ६० ते ७५ दिवसात माजावर येणे व म्हशी १२० दिवसात माजावर येणे अपेक्षित असते. 

image-fallback
जनावरांमध्ये कृत्रिम रेतन का करावे?

सांभाळलेल्या कालवडी २५० किलो शरीर वजनात तर वगारी, रेड्या २७५ किलो शरीर वजनात माज दाखवतात. 

योग्य वेळी कृत्रिम वेतन होण्यासाठी प्रत्येक जनावराचा अंदाजे माजाचा कालावधी किती आहे. याची माहिती पशुपालकांना असावी.

कृत्रिम रेतनासाठी केवळ नियमित माजावर येणारीच म्हणजे २१ दिवसानंतर माज चक्रातील जनावरे पात्र ठरतात. 

माजाच्या संबंधित अनियमितता, सदोषता, सलगता दिसून आल्यास तज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. 

माजाच्या काळातील योनीमार्गाद्वारे दिसून येणार स्त्राव, बळस किंवा सोट नेहमी पारदर्शक अंड्याचा बलकासारखा, काचेसारखा, लोंबकळणारा रंगहीन असणारा दिसून आला तरच कृत्रिम रेतन करून घ्यावे. 

माजाच्या अनेक लक्षणांपैकी सर्वच लक्षणे माजाच्या काळात दिसून येणे आवश्यक नसते. 

माजावर असणाऱ्या जनावरांच्या बाबतीत चारा पाणी न देणे, बांधून ठेवणे, बसू न देणे, निरणाखाली डागणे अशा अघोरी प्रथा टाळाव्यात. 

माजा च्या काळात कृत्रिम रेतनापूर्वी व नंतर जनावराला ताण वाढवणाऱ्या सर्व बाबी टाळाव्यात. 

माजाच्या अंतिम टप्प्याच्या अवस्थेत कृत्रिम रेतन करावे. 

माजाच्या काळातील कृत्रिम रेतनानंतर बारा तासांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही माज अवस्था सुरूच असणाऱ्या जनावरांसाठी तज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. 

माजाच्या कालावधीनंतर केवळ सशक्त आणि सुदृढ गाईत दिसून येणारा सौम्य रक्तस्त्राव नैसर्गिक असल्यामुळे स्वच्छता ठेवून दुर्लक्षित करावा. या काळात आणि नंतर ही कृत्रिम रेतन करू नये. अशा रक्तस्त्रावाचा गर्भधारणेशी किंवा रेतनाशी संबंध नसतो. 

माजाचा काळ संपल्यानंतर दिसून येणारा जनावरांचा थोडा थकवा पोषक आहारातून लगेचच कमी करावा.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com