Livestock Culture : "गुज्जर समाज: हिमाचल आणि उत्तराखंडातील भटक्या पशुपालकांची बदलती ओळख"

Animal Care : गुज्जर, ज्यांना 'वन गुजर' म्हणून ओळखले जाते, हे भटक्या मुस्लिम पशुपालकांचे एक समूह आहे, जो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उंच पर्वतरांगेत आपले जीवन व्यतीत करतो.
Animal Care
LivestockAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत अनेक भटके पशुपालक आहेत. गद्दी शेळ्या आणि मेंढ्या पाळतात. गुज्जर म्हशी पाळतात. त्यांना वन गुजर असंही म्हणतात. वन गुजरांच्या घराला दारं नसतात. उन्हाळ्यात हिमालयाच्या पायथ्यापासून उंचावर जातात. कारण तिथे त्यांच्या म्हशींसाठी चारा असतो. चारा म्हणजे केवळ गवत नाही तर विविध झाडांची पानं.

गलातील कोणत्या झाडांची पानं म्हशींच्या आहारात असतील तर दुधाचा स्निग्धांश म्हणजे फॅट वाढेल याचं वन गुजरांना अचूक ज्ञान असतं. कोणत्याही झाडाचा पाला काढताना ते झाड पुन्हा पानांनी भरून जाईल याची खबरदारी ते घेतात. म्हशीच्या दुधाची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नातून वन गुजर त्यांच्या गरजेच्या अन्य वस्तू विकत घेतात.

वन गुजर शिकार करत नाहीत. शाकाहारी आहेत. चोरून शिकार करणाऱ्या टोळ्यांची बित्तंबातमी ते वन विभागाला देत असत. त्यांच्याकडचे रेडे ते शेतकऱ्यांना विकतात. शेतकरी या रेड्यांना नांगराला जुंपतात. त्याशिवाय शेतमालाच्या वाहतुकीसाठीही रेड्यांचा उपयोग होतो.

वन गुजरांच्या मालकीची कोणतीही जमीन नाही. जंगल, कुरणं इत्यादी सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरच त्यांच्या म्हशी व अन्य प्राणी चरतात. वन गुजर एका राज्याचे रहिवासी नाहीत. उत्तर प्रदेश राज्यातील तराईच्या प्रदेशातून ते उत्तराखंड वा हिमाचल प्रदेशातील उत्तुंग पर्वतरांगांमध्ये जातात. भारत सरकारच्या कायद्यांमुळे त्यांना विविध प्रदेशांमध्ये अटकाव केला जातो. कारण राष्ट्रीय उद्यानात वा अभयारण्यात म्हणजे राखीव वनक्षेत्रात वन गुजरांना प्रवेश बंदी करण्यात येते.

Animal Care
Livestock Census : नेटवर्क अडथळ्यांमुळे दुर्गम भागांत पशुगणनेचा वेग मंदावला

तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात सबब तुमची व्यवस्था उत्तराखंड सरकारने का करावी असं त्यांना सरकारी अधिकारी विचारतात. म्हशी आणि वन गुजर यांना राष्ट्राच्या वा राज्यांच्या सीमांची माहिती नाही. आपण कोणत्या राज्याचे रहिवासी आहोत हे त्यांना माहीत नसतं. उन्हाळ्यात आपण हिमालयात असतो आणि हिवाळ्यात तराईच्या प्रदेशात एवढंच त्यांना माहीत असतं. अभयारण्यं आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी डेहराडून येथे आंदोलन केलं होतं.

वन गुजरांचा धर्म मुस्लिम आहे. ते केवळ नमाज म्हणजे प्रार्थना करतात. रोज करतातच असंही नाही. ते रोजे पाळत नाहीत. कारण त्यांची दिनचर्या वेगळी आहे. त्यांना इस्लाम धर्माची ऑथेंटिक माहिती नाही. कारण त्यांना कुराण वाचता येत नाही. त्यांच्यामध्ये साक्षरता फारच कमी आहे.

Animal Care
Livestock Culture : मध्य आशियापासून भारतापर्यंत पशुधन संस्कृतींचा प्रवास

त्यांना एका जागी स्थायिक करण्याचा चंग सरकार नावाच्या संस्थेने बांधला आहे. काही ठिकाणी ते नाइलाजास्तव स्थायिक झाले आहेत. जिथे स्थायिक झाले तिथे मुल्ला-मौलवी पोचले. कारण वन गुजर मुस्लिम आहेत ही बाब त्यांच्या लढ्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे मुल्ला-मौलवींपर्यंत पोचली. मुल्ला-मौलवींच्या शिकवणुकीमुळे वन गुजर खरेखुरे मुस्लिम बनण्याच्या प्रयत्नात आहेत. भटक्या जमातीच्या चालीरिती, प्रथा-परंपरा बदलू लागल्या आहेत.

भटक्यांनी एका जागी स्थिर व्हावं, निसर्गावरचं अवलंबित्व सोडून मुख्य प्रवाहात यावं. त्यासाठी त्यांना राखीव जागा मिळाव्यात, अशी आधुनिक वा वैज्ञानिक विचारधारा आहे. या विचारधारेनुसार समाजाचं एकजिनसीकरण होणं, हीच मुक्तीची पूर्वअट आहे. वास्तविक वन गुजर महिलांना भटकंतीमध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य अनुभवता येत होतं. एका जागी स्थायिक झाल्यावर वन गुजरांना मुस्लिम या अस्मितेमध्ये विलीन होणं भाग पडतं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com