Chitale Semen Lab : चितळे डेअरीचा भिलवडी येथे आशियातील सर्वात मोठा ‘सेक्सेल सीमेन’ प्रकल्प

चितळे डेअरीचा सेक्सेल सीमेन प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल आहे, असे माजी केंद्रीय कृषिमत्री शरद पवार म्हणाले.
Chitale Seamen Lab
Chitale Seamen LabAgrowon

भिलवडी, जि. सांगली ः ‘‘चितळे डेअरीचा सेक्सेल सीमेन प्रकल्प (Sexel Semen Project) कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. त्याचा कृषी विकास दरवाढीसाठी (Agriculture growth) उपयोग होईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

भिलवडी (ता. पलूस) येथील चितळे डेअरी जेनेटिक लॅबच्या उद्‍घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. जगातील सर्वांत मोठ्या अशा बोवाईन कंपनीच्या सहकार्याने आशिया खंडातील सर्वांत मोठी सेक्सेल सीमेन प्रयोगशाळा या ठिकाणी उभारली आहे. ज्येष्‍ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Chitale Seamen Lab
Animals Care : जनावरांमध्ये गोचीडनाशकामुळे होणारी विषबाधा

गडकरी म्हणाले, ‘‘वाढत्या शहरीकरणाने शेती क्षेत्र कमी होत आहे. शेती सबळ होण्यासाठी पूरक व्यवसाय वाढले पाहिजेत. दूध व्यवसाय नफ्यात येण्यासाठी सरासरी दूध उत्पादन वाढले पाहिजे.

ते जेनेटिक विज्ञानातील संशोधनामुळे शक्य आहे. प्रयत्न फळभाज्यांमध्ये सुरू आहे. चितळेंनी काळानुरूप असे अनेक बदल यापूर्वीच स्वीकारले आहेत. सीमेन लॅबचा प्रकल्प क्रांतिकारी ठरेल. त्याची पुनरावृत्ती देशभरात व्हावी. त्यासाठी केंद्र सर्वतोपरी मदत करेल.’’

Chitale Seamen Lab
Animal Care : नवजात वासराची घ्यावयाची काळजी

पवार म्हणाले, ‘‘आधुनिकता व संशोधक वृत्ती चितळेंचा स्थायीभाव आहे. हा उपक्रम दुधाचे अर्थशास्त्र बदलेल. उत्पादकांना आर्थिक स्थैर्य देईल. दुग्ध व्यवसायाला दिशा देईल. ब्रिटिश कालखंडात महात्मा फुलेंनी नव्या जाती, बीज, आधुनिकतेचा आग्रह गोऱ्या अधिकाऱ्यांकडे धरला होता.

कृषिमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर मी अशी अनेक धोरणे पुढे नेली. देशाने कृषी उत्पादनात आघाडी घेतली. चितळेंचे असे उपक्रमही देशाला पुढे नेतील. अतिरिक्त उत्पादन वाढीची चिंता न करता साखर उद्योगांप्रमाणे अन्य दूध उपपदार्थांकडे उद्योजकांनी जावे.’’

डेअरीचे संचालक विश्‍वास चितळे यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री सुरेश खाडे, नानासाहेब चितळे, विश्‍वास चितळे, श्रीपाद चितळे, अनंत चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, खासदार श्रीनिवास पाटील, संजय पाटील, आमदार विश्‍वजित कदम, जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंग नाईक, सुमन पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड, पृथ्वीराज देशमुख, सदाशिव पाटील, अमरसिंह देशमुख, दिनकर पाटील, जिल्हाधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश रावत यांनी आभार मानले.

‘सेक्सेल सीमेन’ म्हणजे काय?

चितळे आणि ‘जीन्स एबीएस’च्या संयुक्त कंपनीच्या वतीने हा प्रकल्प उभारला आहे. यात गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन केल्यानंतर मादीच जन्माला येईल, अशी जवळपास शंभर टक्के खात्री असते. यापूर्वी या प्रयोगशाळेत मुऱ्हा जातीची म्हैस आणि महाबली वळू यांच्या संयोगातून पहिले सेक्सेल अपत्य जन्माला आले आहे.

‘सेक्सेल सीमेन’ वापरून या वर्षी सुमारे एक लाख सेक्सेल रेत डोस तयार करण्यात येतील. भारत आणि ब्रिटन यांच्यात २०१५ मध्ये झालेल्या अॅग्रिकल्चर डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट कराराच्या अनुषंगाने केलेल्या घोषणेतील हा एक प्रकल्प आहे.

या प्रकल्पांतर्गत भारतात प्रथमतः उच्च पुनरुत्पादन क्षमता असलेले निवडक वळू, भ्रूण तसेच जिवंत वळू अमेरिकेतून आयात करून ब्रह्मा या बूल सेंटरमध्ये त्यांची जोपासना करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अमेरिकेच्या दर्जाचे उच्च प्रतीचे रेत आपल्या शेतकऱ्यांना मिळतील. प्रत्येक वर्षी ३५ ते ४० लाख रेत डोसचे उत्पादन केले जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com