Animal Diseases : जनावरांतील त्वचा आजारांवर उपाय

Animal Skin Diseases : जनावरे त्वचेच्या विविध आजारांमुळे प्रभावित होऊ शकतात. यातील काही आजार हे जिवाणू, बुरशी, परजीवी आणि विषाणूंमुळे होतात. काही आजार पर्यावरणीय घटकांमुळे किंवा पौष्टिक अन्न घटक कमतरतेमुळे होतात.
Animal Diseases
Animal DiseasesAgrowon
Published on
Updated on

डॉ.प्रशांत म्हसे, डॉ.प्रशांत पवार

Animal Care : जनावरे त्वचेच्या विविध आजारांमुळे प्रभावित होऊ शकतात. यातील काही आजार हे जिवाणू, बुरशी, परजीवी आणि विषाणूंमुळे होतात. काही आजार पर्यावरणीय घटकांमुळे किंवा पौष्टिक अन्न घटक कमतरतेमुळे होतात.

दाद (डर्माटोफायटोसिस):
- दाद हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे त्वचेवर वर्तुळाकार, सुजलेले व्रण आणि त्वचा खवलेदार होतात.
- हा आजार जनावरांमध्ये अत्यंत संक्रमक आहे. मानवांमध्ये देखील संक्रमण होऊ शकते.
- उपचार ः सामान्यत: अँटीफंगल औषधे आणि प्रभावित जनावरांना वेगळे ठेवावे.

मेंज/ खरूज संसर्ग :
- मेंज सूक्ष्म कीटकांमुळे होतो. सारकॉप्टिक मेंजमुळे तीव्र खाज सुटते आणि केस गळतात.
- कोरिओप्टिक मेंज प्रामुख्याने खालच्या पायांवर परिणाम करते. उपचारांमध्ये अॅकॅरिसाइड्स आणि योग्य स्वच्छता यांचा समावेश आहे.

बोवाइन पॅप्युलर स्टोमाटायटीस:
- विषाणूजन्य आजारामुळे तोंडावर आणि तोंडाभोवती लहान, उंचावलेले आणि लाल पुरळ येतात.
- हा आजार स्वयं-मर्यादित असतो. उपचारांशिवाय बरा होतो.

Animal Diseases
Animal Infectious Diseases : जनावरांतील संसर्गजन्य आजारांवर उपचार...

उवांचा प्रादुर्भाव:
- उवांच्या विविध प्रजातींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यामुळे खाज सुटणे, केस गळणे आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.
- जनावरांची स्वच्छता ठेवावी.

जिवाणूंमुळे होणारे आजार ः
- त्वचारोग आणि स्टेफिलोकोकल त्वचा आजाराचे संक्रमण होऊ शकते.
- उपचार ः जनावरांची चांगली स्वच्छता ठेवावी. तातडीने औषधोपचार करावेत.

फोटोसेन्सिटायझेशन (प्रकाशसंवेदी आजार):
- जेव्हा जनावरे विशिष्ट वनस्पती किंवा रसायने खातात,त्यामुळे त्यांची त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील होते. तेव्हा फोटोसेन्सिटायझेशन होऊ शकते.
- आजारामुळे तीव्र सनबर्न, फोड आणि त्वचा सोललेली दिसते.
- उपचार ः आहारातून अपायकारक घटक काढून टाकावेत. जनावरे सावलीत बांधावीत.

Animal Diseases
Animal Care : जनावरांतील खरुज, आसडी वर सोपे उपाय काय आहेत?

मस्सा/वार्ट (पॅपिलोमा):
- बोवाईन पॅपिलोमाव्हायरस विषाणूमुळे हा आजार दिसतो. मस्सा हे सामान्यत: लहान असतात. त्वचेवर वाढतात. यावर पशूतज्ज्ञांच्याकडून योग्य उपचार करणे गरजेचे आहे.

एलर्जीक प्रतिक्रिया:
- जनावरांना विशिष्ट वनस्पती, कीटक किंवा पर्यावरणीय घटकांमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. यामुळे पित्ती, खाज सुटणे आणि लालसरपणा येतो.
- उपचार ः ॲलर्जी निर्माण करणारा घटक ओळखावेत.

फ्रॉस्टबाइट आणि हायपोथर्मिया:
- अति थंड हवामानात फ्रॉस्टबाइट आणि हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेचे नुकसान होते.
- जनावरांना थंडी लागणार नाही याची काळजी घ्यावी.

पौष्टिक अन्न घटक कमतरता:
- खराब पोषणामुळे केस गळतात. त्वचेचे आजार वाढतात.
- जनावरांना पुरेशी जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार द्यावा.


लाळ्या खुरकूत ः
- हा विषाणूजन्य आजार आहे. संसर्गामुळे तोंडात आणि आजूबाजूला आणि पायांवर द्रव भरलेले फोड होतात जे फुटून जखमा होतात, परिणामी खाण्यास किंवा हालचाल करण्यास अनिच्छा निर्माण होते.
- लसीकरण हा योग्य उपाय आहे. आजारी जनावरांची चांगली स्वच्छता ठेवावी. तातडीने पशूवैद्यकाकडून उपचार करावेत.

---------------------------------------
संपर्क ः डॉ.प्रशांत म्हसे,९०११४११०६६
(सहाय्यक प्राध्यापक पशू सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com