Animal Care : कडक उन्हामुळे होणारे जनावरांतील आजार कसे टाळाल?

Animal Heat Stress : कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात, गर्भपात, ताप दिसून येतो. हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचं आरोग्य बिघडत आहे. याशिवाय पावसाळ्यापुर्वी केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळेही जनावरांवर ताण येत असतो.
Animal Care
Animal Care Agrowon
Published on
Updated on

Animal Health Management : कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात, गर्भपात, ताप दिसून येतो. हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचं आरोग्य बिघडत आहे. याशिवाय पावसाळ्यापुर्वी केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळेही जनावरांवर ताण येत असतो.

रा्ज्यात सध्या बहुतांश भागात तापमान ४० अंशांपेक्षा जास्त आहे. राज्यभर तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मानसांसोबतच जनावरांनाही उन्हाचा तडाखा जाणवत आहे.उष्णता आणि आर्द्रतेमुळे जनावरांची शरीरक्रिया आणि संतुलन बिघडतं. अशावेळी जनावरांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उपाय करताना पहिल्यांदा जनावरे दिवसा चरायला नेणं पूर्णपणे बंद करावं. त्यांना गोठ्यामध्येच चारा मिळेल असं नियोजन करावं.

Animal Care
Animal Care : कसे ओळखायचे जनावरांतील पोटाचे आजार ?

जनावरे सावलीत, थंड ठिकाणी, मोकळी - खेळती हवा असणाऱ्या जागी बांधावीत. जनावरांना भरपूर, थंड, सतत पाणी पिण्यासाठी सोय तयार करा.गोठ्याचे छत पेंडी, गवत, पांढरा रंग, पाण्याचा शिडकावा यातून थंड करावं.गरजेप्रमाणे दुपारी जनावरांच्या अंगावर, डोक्‍यावर थंड पाणी शिंपडावं.

तुळस, मंजिष्ठा, शतावरी, अश्‍वगंधा, अनंतमूळ, पिंपळी, आवळा यासारख्या वनस्पतींचा वापर करुन जनावरांतील ताण कमी करता येतो. याशिवाय म्हशींच्या लहान वासरांची विशेष काळजी घेऊन, त्यांना उर्जावर्धक औषधी द्यावी. जनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क आणि उष्णतारोधक सेलेनियम जीवनसत्त्व ई यांचा वापर करावा. जनावरांच्या शरिराचं तापमान जर वाढलं असेल तर लगेच पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.

गाभण जनावरांतील गर्भपात टाळण्यासाठी त्यांना दिवसभर पूर्ण सावलीत ठेवावं. अस्वस्थ जनावरांवर तातडीने उपचार करावेत. हिरव्या चाऱ्याची गरज पुर्ण कण्यासाठी त्यांना हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने तयार केलेला चारा द्यावा. प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी त्यांच्या आहारात अझोला या पाणवनस्पतीचा वापर करावा.सध्या बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात आहेत. जनावरांच्या आहारात २० टक्के प्रमाणात याच्या सालींचा वापर करावा.

जनावरांच्या आहारात संत्री, मोसंबी, लिंबू, खरबूज, अननस यांचा चोथाही उपयोगात आणावा. जनावरांच्या नाकासमोर तळहात धरल्यास उष्ण श्‍वास, श्‍वासाची गती लक्षात येवू शकते. श्‍वासाच्या वेळी पोटाचा भाता सतत हलत असेल तर अशा जनावरांवर लगेच पशुवैद्यकांद्वारे उपचार करावेत. शरीराच्या कातडीत पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास चिमटीत येणारी कातडी "चिमटी' दाखवते, अशा जनावरांना तात्काळ पुरेसे सलाईन उपचार गरजेचे आहे.उष्णतेमुळे वावटळी निर्माण होतात, तेव्हा जनावरांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.

डोळ्याची आतली त्वचा पांढरी किंवा रक्ताळलेली असल्यास रक्तवर्धक औषधीसह विषबाधा टाळणाऱ्या उपाययोजना करावी. चाऱ्याची कमता असेल तर उरलेले अन्न, खराब शिळे झालेले अन्न जनावरांना अजिबात देऊ नका. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्प आणि फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. अशाप्रकारे उष्णतेच्या लाटेत जनावरांची काळजी घेत्यास नक्कीच जनावरांतील उष्णतेमुळे होणारे आजार टाळता येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com