Residue Free Milk : ‘रेसिड्यू फ्री’ दुधाचे आता होणार उत्पादन

Milk Production : विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प शेतीपूरक व्यवसायाला गती देणारा ठरला आहे. या प्रकल्पाअंतर्गत लवकरच ‘रेसिड्यू फ्री’ दूध उत्पादनावरही भर दिला जाणार आहे.
Milk Production
Milk ProductionAgrowon

Nagpur Milk News : विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प शेतीपूरक व्यवसायाला गती देणारा ठरला आहे. या प्रकल्पाअंतर्गत लवकरच ‘रेसिड्यू फ्री’ दूध उत्पादनावरही भर दिला जाणार आहे.

त्यासाठी जनावरांवर उपचार करताना ॲलोपॅथी (ॲन्टिबायोटीक) उपचाराऐवजी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब होणार आहे. यासाठी नागपूर विभागात आयुर्वेदिक औषधी निर्मिती युनिट उभारण्याचे नियोजन आहे.

सध्या मराठवाड्यातील चार आणि विदर्भातील सात अशा एकूण ११ जिल्ह्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प राबविला जात आहे. या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत प्रति दिन दूध संकलन तीन लाख लिटरवर पोचले आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ ते ५० हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.

या प्रकल्पामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति दिन सहा लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

Milk Production
Gokul Milk Business : ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे!

कोरोना नंतरच्या काळात पोषक आहाराबाबत लोकांच्यामध्ये जागृती वाढीस लागली आहे. त्याची दखल घेत विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘रेसिड्यू फ्री’ दुधाच्या उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दुधात ॲलोपॅथी औषधांच्या घटकांचे अंश उतरणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावस्तरावर पशुसखींची नियुक्‍ती

जनावरांवर उपचार करताना आयुर्वेदिक उपचार पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे. त्याकरिता निसर्गात उपलब्ध औषधी वनस्पतींचा वापर उपचारासाठी केला जाणार आहे.

उपचारासाठी लागणाऱ्या पूरक औषधी वनस्पतींची उपलब्धता व्हावी, याकरिता नागपूर विभागात खास युनिट उभारण्यात येणार आहे. एनडीडीबी (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) मार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याकरिता गावस्तरावर खास पशुसखींची नियुक्‍ती केली जाईल. त्यांच्या माध्यमातून जनावरांवर उपचार होतील.

आपल्याकडे परंपरेने आयुर्वेदिक उपचार पद्धती होती. मात्र ॲलोपॅथी उपचार पद्धती सोपी असल्याने वापर वाढीस लागला. ‘रेसिड्यू फ्री’ दूध उत्पादनात मात्र ॲलोपॅथी औषधांचा वापर केला जाणार नाही. जनावरांना तोंडावाटे उपचार तसेच जखम झाल्यास औषधी वनस्पतींचा अवलंब केला जाईल. एनडीडीबीच्या सहकार्यातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.
डॉ. सतीश राजू, अतिरिक्त प्रकल्प संचालक, विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com