उर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांना होतो ‘हा’ आजार !

पावसाळ्यात माणसाबरोबरच जनावरांच्या शरीराचे देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात उर्जेची गरज असते. जनावरांच्या चयापचय क्रियेत बिघाड झाल्याने जनावरांना किटोसीस सारखे आजार होत असतात.
Reasons for Ketosis in cow
Reasons for Ketosis in cowAgrowon

पावसाळ्यात माणसाबरोबरच जनावरांच्या शरीराचे देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात उर्जेची गरज असते. जनावरांच्या चयापचय क्रियेत बिघाड झाल्याने जनावरांना किटोसीस सारखे आजार होत असतात.

जनावरांच्या शारीरिक क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी उर्जा न मिळाल्यास आम्लतेसाठी पोषक घटक शरीरात तयार होतात. शरीरातील किटोन बॉडीजचे प्रमाण वाढल्याने जनावरांना किटोसीस होत असतो.

किटोसीस होण्यामागची कारणे-

किटोसीस हा आजार जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये दिसून येतो. गाय व्यायल्यानंतर आहारात कर्बोदकांची कमतरता असल्यास ग्लुकोजचे प्रमाण देखील कमी होत जाते. गायीला तिच्या दूध उत्पादनाच्या प्रमाणात आहारात उर्जा पुरवणारे घटक न दिल्यास शरीरात हव्या त्या प्रमाणात उर्जा तयार होत नाही.

जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असणे तर स्फुरद, कोबाल्ट या मुलद्र्व्याची कमतरता असणे. गाभण काळात जनावरांच्या शरीरावर असणाऱ्या चरबीचे प्रमाण जास्त असणे.

अशा परीस्थितीत जनावर शरीरातील चरबीपासून उर्जा मिळवण्याचा प्रयत्न करते. हे होत असताना चरबी फॅटी ॲसिडच्या स्वरुपात लिव्हरमध्ये आणली जाते. त्यापासून ॲसिटेट तयार होऊन, उर्जेची निर्मिती केली जाते.

याउलट शरीरात प्रोपिओनेटची कमतरता झाल्यास, ॲसिटेटपासून किटोन बॉडीज तयार होऊन, त्याचे रक्तातील प्रमाण वाढते. यालाच रक्तजल आम्लता किंवा किटोसीस म्हणतात.

सर्वसाधारणपणे जनावरांमध्ये किटोसीस जनावर व्यायल्यानंतर सुरुवातीच्या एक ते दोन आठवड्यामध्ये दिसून येतो. काही वेळेस दीड-दोन महिन्यानंतरही दिसून येतो.

लक्षणे-

जनावरांचे खुराक किंवा पशुखाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावरे अशक्त होत जातात.

दूध उत्पादनात घट दिसून येते. जनावरांच्या दुधाला आणि लघवीला एक प्रकारचा गोडसर वास येतो.

खाणेपिणे बंद झाल्याने रवंथ देखील बंद होते. जनावराची दृष्टी मंदावते, थरथर कापू लागते, जनावर अखाद्य वस्तू चाटू लागते.

काही प्रकारात मज्जातंतूवर परिणाम झाल्याने, मेंदूला इजा होते. जनावर गोल-गोल फिरते. भिंतीला धडका मारते यांसारखी लक्षणे दिसून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार पद्धती-

पशुपालकांनी जनावरांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केले असता हा आजार टाळता येतो.

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आजारी जनावरास ५० टक्के डेक्सट्रोज सलाईन आणि जीवनसत्व-‘ब’ चे इंजेक्शन दिले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com