Animal Care: पशूंच्या गर्भधारणेला आडकाठी

साधारणतः: मार्च महिन्यापासून माजावर आलेल्या गायी-म्हशींना पशुमालक कृत्रिम रेतन केंद्रामध्ये नेऊन जर्सी, होस्टेन, देशी वाण, गीर, साहिवाल, हरियाना, लाल डांगी या उपलब्ध असणाऱ्या जातींपैकी आपल्या पसंतीनुसार गर्भधारणेकरिता सिमेंन्सची निवड करून लसीकरण पूर्ण करून घेतात.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

पथ्रोट, अमरावती : येथील कृत्रिम रेतन केंद्रात पशूंच्या गर्भधारणेसाठी वारंवार करण्यात येणाऱ्या लसीकरणानंतरही गर्भ थांबत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चिंताग्रस्त पशुमालकांनी अशी जनावरे विक्रीस काढली आहेत. परिणामी, ही जनावरे कत्तलखान्याकडे जात असतानाच पशुधनही (Livestock) कमी व्हायला लागले आहे.

गाय व म्हशीची एकवेळा प्रसूती झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांत तिला पुन्हा गर्भधारणा होते. त्यासाठी आरोग्य व पोषक वातावरण, अशा दोन्ही गोष्टींचा संगम आवश्यक असतो. साधारणतः: मार्च महिन्यापासून माजावर आलेल्या गायी-म्हशींना पशुमालक कृत्रिम रेतन केंद्रामध्ये नेऊन जर्सी, होस्टेन, देशी वाण, गीर, साहिवाल, हरियाना, लाल डांगी या उपलब्ध असणाऱ्या जातींपैकी आपल्या पसंतीनुसार गर्भधारणेकरिता सिमेंन्सची निवड करून लसीकरण पूर्ण करून घेतात.

तर काही पशुमालक वळूमार्फत नैसर्गिक गर्भधारणा करून घेतात. दरवर्षी हे व्यवस्थित सुरू असताना या वर्षी मात्र माजावर आलेल्या पशूंना गर्भधारणेचे लसीकरण केल्यानंतरही गर्भ टिकत नसल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पशू पुन्हा माजावर येण्यासाठी सातशे ते आठशे रुपयांपर्यंतचा खर्च औषधीवर केल्यानंतरही वारंवार लसीकरण (Vaccination) करण्याची वेळ पशुमालकांवर येत आहे. एवढा खर्च करूनही गर्भधारणा होत नसल्यामुळे पशुमालकांनी भाकड जनावरे विक्रीस काढली आहेत. सदर जनावरे कवडीमोल भावात विकावी लागत असल्याने नुकसानदेखील होत आहे.

लसींची गुणवत्ता तपासावी

या वर्षी होणारा हा प्रकार उष्ण तापमानामुळे होत आहे. त्यातच त्यांना देण्यात येणारे ढेप हे खाद्य बीटी कापूसपासून तयार होते. तेसुद्धा शरीरात उष्ण तापमान निर्माण करते. त्यामुळेच वारंवार रिपीटचे प्रकार वाढले. हा त्यातलाच एक भाग असू शकतो. याशिवाय येथील कृत्रिम रेतन केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या लसींची गुणवत्ता तपासण्याचीही वेळ आली असल्याचे मत पशुमालक रितेश नवले यांनी व्यक्त केले आहे.

जनावरे विकली

गाय व म्हैस खाली राहत असल्याने व चराईचा खर्च पाहता तो परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही आमच्याकडील सहा जनावरे कवडीमोल भावात विकून टाकली असल्याची माहिती पशुमालक उमाकांत उपासे व भास्कर कानडे यांनी दिली.

पथ्रोट येथील कृत्रिम रेतन केंद्रामध्ये लवकरच एक मेळावा घेण्यात येईल. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अशा पशूंची तपासणी करून योग्य असे उपचार करून पशुमालकांना तशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल.

डॉ. संजय कावरे जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com