Livestock Rearing : गोपालनात आहार, आरोग्य व्यवस्थापनावर भर

Employee to a successful dairy Entrepreneur : गोपालनात जनावरांच्या आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य व्यवस्थापनाला प्राधान्य दिल्यास दूध उत्पादन व जनावरांची कार्यक्षमता वाढू शकते. पोषणयुक्त चारा, नियमित वैद्यकीय तपासणी आणि स्वच्छता या गोष्टींचा योग्य समतोल राखणे अत्यावश्यक आहे.
Animal
Animal Agrowon
Published on
Updated on

Livestock Management :

शेतकरी नियोजन । पशुपालन

शेतकरी : अमोल शरद कुटे

गाव : बालाजी देडगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

एकूण शेती : २ एकर

गाईची संख्या : १५ गाई व ३ कालवडी.

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक तरुण शेतकरी पशुपालनाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. बालाजी देडगाव (ता. नेवासा) येथील अमोल शरद कुटे या तरुण शेतकऱ्याने नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय करण्यावर भर दिला आहे. अमोल यांची घरची केवळ दोन एकर शेतजमीन आहे. बारावीनंतर त्यांनी आयटीआयचे शिक्षण घेऊन पुण्यातील एका नामांकित कंपनीत वर्षभर नोकरी केली. मात्र, नोकरीतून मिळणारा कमी पगार आणि नोकरीत मन लागत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला.

Animal
Cow Rearing : गोठा स्वच्छता, निर्जंतुकीकरणावर भर

२०१९ मध्ये त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी दोन कालवडी खरेदी केल्या. जुने साहित्य वापरून अल्प खर्चात चार गुंठ्यावर मुक्तसंचार गोठा उभा केला. दूध उत्पादन सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने गाईंच्या संख्येत वाढ केली. सध्या त्यांच्याकडे १५ गाई आणि तीन कालवडी आहेत. पशुपालनातून प्रतिदिन ११० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. जनावरांना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात मका, गिन्नी गवत, लसूणघास आदी चारा पिकांची लागवड आहे.

दुग्ध व्यवसायात अमोल यांना वडील शरद, आई उषाताई यांची मदत मिळते. गणेश यांनी महिनाभरापूर्वी स्वतःच्या गोठ्यातील गाईंच्या दुग्ध उत्पादनासोबतच इतर शेतकऱ्यांकडून दूध संकलन करत केंद्र सुरू केले आहे. तेथे दररोज २०० लिटर दुधाचे संकलन होते आहे.

Animal
Animal Care : विल्यानंतर गाय, म्हशींचा आहार कसा असावा?

व्यवस्थापनातील बाबी

गोठ्यातील दैनंदिन कामांना दररोज सकाळी सव्वापाच वाजता सुरुवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. दूध काढणीसाठी मिल्कींग मशिनचा वापर केला जातो. दूध काढून झाल्यानंतर गाईंना चारा व खुराक दिला जातो. चारा देताना एका गाईला साधारणपणे पंधरा किलो चारा कुट्टी दिली जाते. त्यात गिन्नी गवत, मका आणि घास असते. सकाळी गाईंना द्यावयाच्या चाऱ्याची कुट्टी रात्रीच करून ठेवली जाते. चार गुंठे क्षेत्रावरील मुक्तसंचार गोठ्यात पाण्यासाठी गव्हाणीची व्यवस्था केली आहे.

दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी गोळीपेंड, सरकी पेंडयुक्त पशुखाद्य दिले जाते. दूध काढणी आणि खाद्याचे सेवन झाल्यानंतर गाई मुक्तसंचार गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात. गाईंचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मुक्तसंचार गोठा पद्धती फायदेशीर असल्याचे त्यांनी व्यवसायाच्या सुरुवातीस मुक्त गोठ्याची उभारणी केली. मुक्तसंचार गोठ्यामुळे काही प्रमाणात कष्ट कमी होण्यास मदत झाली असल्याचे अमोल कुटे सांगतात.

आरोग्य व्यवस्थापन

लम्पी त्वचा आजार, लाळ्या खुरकूत यांचे प्राधान्याने प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. लम्पीचे वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. लाळ्या-खुरकुताचे लसीकरण करून आता तीन महिने झाले आहेत. दर तीन महिन्यांनी गाईंना जंताच्या गोळ्या दिल्या जातात. पशुवैद्यकांच्या मदतीने लसीकरण करण्यावर भर दिला जातो. वेळोवेळी पशुवैद्यक गोठ्याला भेट देतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आहारासह इतर व्यवस्थापनात आवश्यक बदल केले जातात. गोठ्यातील लहान वासरांची तीन महिन्यापर्यंत विशेष काळजी घेतली जाते.

मुरघास निर्मिती

चारा टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी शेतामध्ये मका लागवड केली जाते. उत्पादित मक्यापासून २० टनांपर्यंत मुरघास तयार करून ठेवला जातो. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणाची पेरणी करतात. काहीवेळा आवश्यकतेनुसार विकत मुरघास घेऊन गाईंना दिला जातो. टंचाईच्या काळात चारा टंचाईवर मात करण्यासाठी मुरघास निर्मिती फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचा अनुभव आहे.

शेणखतातून आर्थिक हातभार

दरवर्षी पशुपालनातून १८ ते २० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील काही शेणखत चाऱ्यासाठी ठेवलेल्या शेतामध्ये वापरले जाते. तर उर्वरित शेणखताची चार हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री केली जाते. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न हाती येते. गोठ्यातील शेणाची दर तीन महिन्यांनी उचल केली जाते. गोमूत्र मिसळलेल्या मुक्त गोठ्यातील शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून फळबागांसाठी खताला मागणी अधिक असते. शेणखताच्या वापरामुळे दर्जेदार चारा, पीक उत्पादन मिळत असून सेंद्रिय कर्बही वाढीस मदत मिळाली आहे.

अमोल कुटे ९८३४२५७१२२

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com