हॅचरीमध्ये पिल्लांना ही लस दिली जाते !

कोंबड्यांची एक दिवसीय पिल्ले हॅचरीमध्ये असताना त्यांचे मॅरेक्स रोगाविरुद्ध लसीकरण न केल्यास त्यांना मॅरेक्सरोगाची बाधा होते.
poultry chick vaccination
poultry chick vaccinationAgrowon
Published on: 
Updated on: 

कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोंबड्याना (poultry disease) होणारे प्रमुख रोग, त्यांची लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती असणे गरजेचं आहे. कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास त्यांना रोगाची बाधा लवकर होते. रोगजंतू आणि रोगजंतुच्या प्रसारास अनुकूल परिस्थिती कुठल्याही रोगास कारणीभूत असते.

कोंबड्यांमध्ये मॅरेक्स (marek's) नावाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. मॅरेक्स हा रोग विषाणूंमुळे होतो. या रोगामध्ये कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने किंबहुना न खाल्ल्याने कोंबड्या मारतात. या रोगाची बाधा सहा ते दहा आठवडे वयाच्या पिल्लांमध्ये दिसून येते. मोठ्या पक्ष्यांमध्ये पाचव्या ते सहाव्या महिन्यात या रोगाची बाधा दिसून येते.

poultry chick vaccination
कोणती कोंबडी देते सर्वात जास्त अंडी ?

या रोगामध्ये कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते. कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. कोंबड्यांची विष्ठा पातळ पडते. पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर उपाय नाही. परंतु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाची असताना मॅरेक्स रोगाविरुद्ध कोंबड्यांना लस द्यावी. ०.२० मिली लस त्वचेखाली दिली जाते. ही लस पिल्ले हॅचरीमध्ये असताना दिली जाते. ही लस दिली न गेल्यास कोंबड्यांना या रोगाची बाधा दिसून येते.

poultry chick vaccination
मान्सूनपूर्व लसीकरण करा, पशुधन वाचवा! | Before Monsoon Vaccination Drive of cow | ॲग्रोवन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com