Animal Care : जनावरांचे उन्हाळ्यामधील व्यवस्थापन

अति उष्ण दमट आणि उष्ण कोरड्या हवामानामध्ये घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची तापमान संतुलित ठेवण्याची प्रक्रिया धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होतो.
Animal Care
Animal Care Agrowon

डॉ.आदित्य मोहिते

सध्याच्या काळात जनावरांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येतो. यामुळे जनावरांमध्ये शरीरातील तापमानाशी निगडित बदल होतात.

अति उष्ण दमट आणि उष्ण कोरड्या हवामानामध्ये (Dry weather) घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची तापमान संतुलित ठेवण्याची प्रक्रिया धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होतो.

१) उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. यामुळे बऱ्याच वेळेस जनावर खाताना रवंथ करत नाही. त्यामुळे त्यांना अपचनासारखे आजार होतात. यामुळे ते चारा कमी खात किंवा पूर्णपणे बंद करतात.

२) अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे कातडीचे आजार दिसतात.

३) उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादकता कमी होते, प्रजनन कार्यक्षमता कमी होते. जनावरे माजावर येत नाहीत. जनावरांतील कोरडा काळ वाढतो.

३) जनावरांच्या देशी जातींमध्ये उष्णतेचा ताण कमी दिसतो. संकरित जाती या उष्णतेच्या ताणास अत्यंत संवेदनशील असतात. म्हशींना त्यांच्या काळ्या त्वचेमुळे जास्त प्रमाणात ताण दिसतो.

Animal Care
Animal Care : पशुधनाची आधी तपासणी मगच खरेदी

ताणाची लक्षणे ः

१) जनावर अस्वस्थ होते. चारा कमी खाते.

२) कातडी कोरडी पडते, डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येणे. डोळे जळजळ करतात.

३) धाप लागते. दूध कमी होते. रवंथ प्रक्रिया कमी होते.

४) जनावर एका ठिकाणी जास्त काळ बसून राहाते.नाडी जलद चालते

व्यवस्थापनाची सूत्रे ः

१) जनावरे सावलीत बांधावीत.

२) गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. गोठ्यामध्ये पंखे लावून उष्णतेचा ताण कमी करता येतो.

३) जनावरांच्या शरीरावर तसेच शेडमध्ये पाण्याची फवारणी करावी. मात्र जास्त पाण्याची फवारणी टाळावी. गोठ्यात पाणी साचून जनावराला खाज सुटणे किंवा कासदाह यासारखे आजार होऊ शकतात.

४) गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये. संपूर्ण दिवसभर, रात्री थंड व स्वच्छ पिण्याचा पाण्याची सोय करावी. जनावरांना गुळाचे पाणी पाजावे.

संपर्क ः डॉ.आदित्य मोहिते,७०८३८५२२१३ (औषधशास्त्र आणि विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com