Jharsim Chicken Breed : वर्षाला सरासरी १७० अंडी देणारी देशी कोंबडीची जात विकसित ; अंड्यांचा आकारही मोठा

Indigenous Chicken : झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने वर्षाला सरासरी १७० अंडी देणाऱ्या देशी कोंबडीची जात विकसित केली आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

Poultry Farming : कृषीप्रधान असलेल्या भारतात शेतीला पूरक म्हणून अनेक शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा कमी खर्चाचा आणि उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ओढा कोंबडीपालनाकडे असतो. मात्र, बऱ्याचदा या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागते. आज आम्ही तुम्हाला कोंबडीच्या अशा जातीबद्दल सांगणार आहोत, जीच्या पालनामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

झारसिम कोंबडी

झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने वर्षाला सरासरी १७० अंडी देणाऱ्या देशी कोंबडीची जात विकसित केली आहे. देशी कोंबडीच्या या जातीचे नाव झारसिम आहे. स्थानिक आदिवासी बोलीतील सीम ज्याचा अर्थ कोंबडी असा होतो.

Poultry Farming
Poultry Business : पावसाळ्यात कोंबड्यांची कशी काळजी घ्याल?

आणि म्हणूनच झारखंड मधील 'झार' आणि 'सिम' यांना मिळून 'झारसिम' असे या कोंबडीचे नाव ठेवण्यात आले आहे. अन्य देशी कोंबड्यांच्या तुलनेत ही कोंबडी दुप्पट अंडी देते. तसेच जन्मानंतर या कोंबडीपासून १८० दिवसांतच अंडी उत्पादन सुरू होते.

Poultry Farming
Poultry Farming : पोल्ट्री शेडसह पक्ष्यांच्या नोंदणीला येणार गती

वर्षाला १७० अंडी देते

झारसिम कोंबडी अन्य देशी कोंबड्यांच्या तुलनेत वर्षाला सरासरी १६५ ते १७० अंडी देते. झारसिम कोंबडीची अंडी सामान्य देशी कोंबडीच्या तुलनेत दुप्पट वजनाची असतात. कारण हिच्या अंड्यांचा आकार सामान्य कोंबडीच्या अंड्यांच्या तुलनेत मोठा असतो. ज्यामुळे त्यांचे वजनही जास्त असते.

या कोंबडीच्या एका अंड्याचे वजन साधारणपणे ५० ते ५५ ग्रॅम असते. तर अन्य देशी कोंबड्यांच्या अंड्यांचे वजन ३० ग्रॅमच्या आसपास असते. झारसिम जातीची ही कोंबडी केवळ तीन महिन्यातच दीडकिलोपर्यंत वजनाची होते.

झारसिम कोंबडीची सर्वात खासियत म्हणजे ही आकर्षक आणि बहुरंगी असते. ही जीवनकाळही अधिक दिवसांचा असतो. या कोंबडीच्या अंड्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. याशिवाय या कोंबडीचे मांस उत्पादनही अधिक असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com