थोडक्यात माहिती..१. संकरित गायीला शरीर वजनाच्या ३% कोरडा खाद्य रोज आवश्यक असतो.२. ५०० किलो गायीला साधारण ४ किलो पशुखाद्य, ३० किलो हिरवा चारा व ६ किलो वैरण लागते.३. गाभण व प्रसूतीनुसार आहार बदलणे आवश्यक आहे.४. अझोला, मुरघास व युरिया प्रक्रिया करून चारा खर्च कमी करता येतो.५. योग्य पाणी, क्षार आणि जीवनसत्त्वे मिळाल्यास दूध उत्पादन व आरोग्य सुधारते.Cattle Feed Ratio: पशुपालन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा शेती पुरक व्यवसाय आहे. त्यातील दुग्धव्यवसाय हा अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. संकरित गाईंच्या आहारावर दुधाचे प्रमाण, दुधातील पोषकता, फॅट तसेच गायीचे आरोग्य अवलंबून असते. शिवाय बदलत्या ऋतुनुसार आणि प्रसुतीनुसार आहारात गरजेचे बदल करणे आवश्यक असते..१. गायींना लागणारा आहारशास्त्रीय माहितीनुसार मोठ्या संकरित गायीला तिच्या शरीर वजनाच्या ३% कोरडे खाद्य दररोज लागते. ५०० किलो वजनाच्या गायीला साधारणपणे ४ किलो पशुखाद्य + ३० किलो हिरवा चारा + ६ किलो वैरण (कोरडा चारा) लागतो. हिरवा व कोरडा चारा नेहमी एकत्र कुट्टी करून द्यावा..२. चारा नियोजनपशुपालांनी किमान ३ महिन्यांचा चारा साठा तयार ठेवावा. मुरघास, युरिया प्रक्रिया, अझोला, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून चारा तयार करता येतो. १ एकर जमिनीतून मिळालेला चारा साधारण ३ संकरित गायींना पुरतो. .Crop Variety: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली ७ सुधारीत/संकरित वाण.३. दूध उत्पादनासाठी आहार प्रत्येक २.५ लिटर दुधासाठी १ किलो पशुखाद्य लागते. प्रत्येक संकरित गायीला अर्धा किलो अधिक पशुखाद्य देऊन सव्वा लिटर दूध वाढते की नाही यावर लक्ष ठेवावे. लुसर्न गवत(लसूण घास/मेथी घास), अझोला दिल्यास पशुखाद्याचा खर्च कमी होतो. अझोला पाला दुधाळ जनावरांसाठी फायदेशीर असतो..४. गर्भधारणेतील आहारसंकरित गाईच्या गाभण काळात दररोज अर्धा ते १ किलो पशुखाद्य जास्त द्यावे. तर प्रसूतीपूर्वी ३० दिवस हळूहळू पशुखाद्य वाढवावे. प्रसूतीनंतर १५ दिवस अचानक जास्त वाढ करू नये.५. जीवनसत्त्वे, क्षार व पाणीजनावरांना योग्य प्रमाणात क्षार व जीवनसत्त्वे दिल्यास शरीर क्रिया चांगली राहते आणि दूध उत्पादन वाढते. पाणी नेहमी थंड, स्वच्छ, निर्जंतुक असावे व जनावराला हवे तेव्हा उपलब्ध असावे..६. ऋतूनुसार काळजीउन्हाळ्यात सकाळी ५ ते दुपारी ३ या वेळेत चाराकुट्टी देणे टाळावे. उर्वरित वेळेत भरपूर कुट्टी द्यावी. गायांना ताक, सोडा, गूळ दिल्यास उष्णतेचा ताण कमी होतो.७. चाऱ्याची टंचाई चाऱ्याची टंचाईच्या काळात गव्हाचे काड, भात पेंढा, वाळलेले गवत यांसारखा चारा युरिया प्रक्रिया करून वापरता येतो. युरिया प्रक्रिया करण्यासाठी युरिया ४%, गूळ २%, क्षार १% एवढे प्रमाण घ्यावे..८. प्रथिनांचे प्रमाणदूध देणाऱ्या गायींच्या आहारात २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रथिने दिल्यास दूधाचे प्रमाण वाढते. मात्र रक्तातील नत्र- युरिया यांचे प्रमाण वाढून प्रजननावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे युरिया प्रमाणात देणेच फायदेशीर राहते.९. चारा-पशुखाद्याचे प्रमाणसंकरित गायांना चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण प्रसूतीनंतर २५:७५ इतके असावे. दूध मध्यम काळात ४०:६० तर मध्यम गर्भधारणा काळात ५०:५० असावे. प्रसूतीपूर्वी चारा ६० टक्के आणि पशुखाद्य ४०टक्के असावे..१०. भूक कमी होण्याची काळजीप्रसूतीपूर्वी गायीची भूक २०-३०% कमी होते. त्यामुळे ताजा, चवदार, वारंवार चारा दिल्याने गायांची भूक वाढते.११. इतर काळजीचारा व पशुखाद्याची सहा महिन्यांनी नमुना तपासणी करून घ्यावी.संतुलित आहार आहे की नाही हे तपासण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड (आनंद, गुजरात) यांनी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs): १. संकरित गायीला दिवसाला किती चारा द्यावा? शरीर वजनाच्या ३% कोरडा खाद्य, उदा. ५०० किलो गायीला ४ किलो पशुखाद्य + ३० किलो हिरवा चारा + ६ किलो वैरण.२. गाभण गायीला अतिरिक्त आहार किती द्यावा? दररोज अर्धा ते १ किलो पशुखाद्य जास्त द्यावे.३. दूध उत्पादन वाढवण्यासाठी कोणता चारा उपयुक्त आहे? लुसर्न गवत, अझोला आणि संतुलित पशुखाद्य दिल्यास दूध उत्पादन वाढते.४. उन्हाळ्यात गायींच्या आहारात काय बदल करावा?सकाळी ५ ते दुपारी ३ या वेळेत चाराकुट्टी टाळावी, ताक-सोडा-गूळ द्यावा.५. संतुलित आहार तपासणी कशी करावी? राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड, आनंद (गुजरात) यांची संगणकीय प्रणाली वापरून तपासणी करता येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.