डॉ. नितीन मार्कंडेयBreeding Management: गाय, म्हैस सदोषतेमुळे उलटते, यात विशेष काही नाही. पण महिनोन् महिने सतत उलटत राहिल्याने होणारे आर्थिक नुकसान फार मोठे असते. सतत उलटणाऱ्या जनावरात नेहमी फार मोठे खर्चिक उपचार केले जातात आणि त्यातून फायदा अत्यंत कमी दिसून येतो, कारण असे उपचार ‘निदान न करता’ होतात, याची जाणीव असूनही पशुपालक सदैव गप्पच असतात. यासाठी पशू तपासणी महत्वाची ठरते. .प्रसूतीनंतर तिसऱ्या महिन्यात गाय आणि चौथ्या महिन्यात म्हशी पुन्हा गाभण राहण्यासाठी सोपे, बिन खर्चिक, अल्पश्रमिक, आवश्यक आणि उपयुक्त प्रयत्न करण्यासाठी गोठ्यात कार्यपद्धतीचा तक्ता लावावा.१.प्रसुतीनंतरचा पहिला माज दिवस = गाय ६०, म्हैस ९०२.प्रसुतीनंतरचा पहिला माज= रेतनासाठी नेहमी अयोग्य३.पहिल्या माजाचा कालावधी= तासात नोंद करा४.पहील्या माजाचा बळस = तार लोंबत फोटो आवश्यक.livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण .५.सामान्य माजाचा बळस/ सोट/ स्राव रंगहीन, पारदर्शक, वासरहित, स्वच्छ , घट्ट, सहज न तुटणारा६.गर्भाशयदाह बळस=पांढरट/ धुरकट/ पिवळसर/दहीरंग ७.गर्भाशयदाह बळस = बळसाची प्रयोगशाळा तपासणी आवश्यक८.गर्भाशय दाह= उपचार आवश्यक, पशुवैद्यकीय सल्ला९.शरीर वजन नोंद= पहिल्या माजापासून दर ७ दिवसास.१०.प्रसूतीनंतर दुसरा माज= पहिल्या माजानंतर २१ दिवस११.प्रसूतीनंतर दुसरा नियमीत माज= रेतन योग्य माज१२.रेतन योग्य माज= पशुवैद्यकीय खात्री आवश्यक१३.रेतन योग्य माज = सामू ७.०० खात्री आवश्यक१४.रेतन योग्य माज= तिसऱ्या टप्प्यात रेतन आवश्यक.१५.रेतमात्रा निवड= पैदास धोरणानुसार अचूकता१६.रेतन योग्य माज= सहज, सुलभ, ताणरहित रेतन१७.रेतनानंतर पुन्हा रेतन= २४ तास अंतरानंतर१८.योग्य रेतन = अनुभवी, प्रशिक्षित तंत्रज्ञ आवश्यक.१९.योग्य रेतन = तापमापक, ३७ अंश सेल्सिअस पाणी आवश्यक२०.योग्य रेतन नोंद = रेतनानंतर रेतमात्रा जपून ठेवणे२१.रेतनानंतर निरीक्षण = माज लक्षणांसाठी २४ तास२२.माजानंतर रक्तस्राव = सामान्यपणे दोन दिवसानंतर२३.माजानंतर रक्तस्राव = शरीरक्रियेसाठी उपचार नकोत२४.माजानंतर पूरक उपाय = क्षार, गूळ, शतावरी.२५.मध्यचक्र माज = रेतनानंतर १० दिवसास२६.मध्यचक्र माज = रेतन नको, स्रीबीज सुटत नाही२७.प्राथमिक गर्भधारणा चाचणी= रेतनानंतर १२ दिवसांपासून२८.प्राथमिक गर्भधारणा चाचणी = मूत्रातील बीज उगवण प्रतिबंध२९.प्राथमिक गर्भधारणा चाचणी= पशुपालकाकडून घरच्याघरी.३०.रेतनानंतर २१वा दिवस= माज लक्षणे अपेक्षित नाही३१.रेतनानंतर २१वा दिवस= माज लक्षणे म्हणजे विफल गर्भधारणेचे संकेत३२.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=रेतनानंतर २१-२५ दिवस सोनोग्राफी सुविधा आवश्यक३३.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=पशुवैद्यक सहाय्य आवश्यक३४.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=गोठ्यात, सुलभ चाचण्या शक्य३५.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=तात्काळ निदान देणाऱ्या चाचण्या उपलब्ध.३६.अधुनिक गर्भधारणा पडताळणी= रु ३००-३५० किंमत३७.गर्भधारणा निदान=सोनोग्राफीद्वारे तपासणी३८.गर्भधारणा निदान =सोनोग्राफी सुरक्षित,खात्रीशीर३९.रेतनानंतर पाठपुरावा= २१, ४२, ६३ दिवसास निरीक्षण४०.गर्भधारणा= निदानानंतर खात्री नेहमी आवश्यकच४१.गर्भधारणा खात्री= गाय साठवा, म्हैस सत्तरावा दिवस.४२.गर्भधारणा खात्री= पशुवैद्यकाकडून तपासणी४३.कालवड- रेडी पहिला माज=अनुक्रमे १०, १८ महिने वयास४४.कालवड-रेडी पहिला माज=अनुक्रमे २५० ते २७५ किलो शरीरवजन४५. कालवड/रेडी पहिला माज= पशुवैद्यकीय तपासणी अनिवार्य४६. कालवड/ रेडी पहिला माज= सामान्य प्रजनन संस्थेची खात्री.४७. कालवड/ रेडी पहिला माज= रेतनास अयोग्यच४८. कालवड/ रेडी माजचक्र = सुरुवातीला अनियमित४९. कालवड/ रेडी माजचक्र = ३/४ माजास नियमित५०.कालवड/ रेडी रेतन= पहिल्या नियमित माजास५१.कालवड/ रेडी माज= कालावधी+लक्षणे कमीच.महत्त्वाचे मुद्दे१. कोरडा गोठा महत्वाचा.२. वेळेवर माज, परिपूर्ण आहाराची हमीच३. एका माजचक्राचे नुकसान, किमान चार हजार४. माजाचा जास्त काळ, स्त्रीबीज सुटण्यास विलंब५. माजाचा खराब बळस, सुप्त गर्भाशय दाह.६. सतत माज, सदाफळी वंध्यत्वाचा प्रकार७. अनियमित माज, रेतनास अपात्र८. पहिला माज, रेतनास नेहमी अपात्र९. अधिक प्रमाणात स्त्राव, रेतनास अपात्र माज१०. माजानंतर रक्तस्त्राव, आधीच संपलेला माज.११. महाग प्रतिजैविक इंजेक्शने, परिणाम अनिश्चित१२. गर्भाशयात औषधी, अपुराच होतो उपचार१३. निदानाशिवाय उपचार, निरुपयोगी खर्च१४. लिखीत नोंदींचा अभाव, तोट्याकडे वाटचाल१५. रेतमात्रेस पर्याय वळू नाही, स्वत:ची प्रयोगशीलता टाळा१६. रेतनच फायदेशीर, २४ प्रकारचे हमखास लाभ.१७. फार लांबलेला माज, रेतन नकोच१८. तुटक माज, दुसर्या टप्प्यातही रेतन आवश्यक१९. लक्षणं आधारित रेतन नको, स्त्रीबीज खात्रीच योग्य२०. उलटण्याची कारणे हजार, कौशल्य हाच प्रहार.लक्षात ठेवा, घातक गर्भाशय दाह१. जिवाणूमुळे होतो सौम्य/ तीव्र गर्भाशयदाह.२. जिवाणूचे असंख्य प्रकार वातावरणात आहेत.३. जिवाणू गोठ्यातील वातावरणात असतात.४. सगळे जिवाणू नेहमी संधी साधू असतात.५. मानवी चुका गर्भाशय दाहास पूरक ठरतात..६. जिवाणूंचा गर्भाशयात चुकांमुळेच प्रवेश घडतो.७. जिवाणू प्रवेश शरीराकडून नेहमी थांबवला जातो.८. योनीचे पडदे, गोलाकार स्नायू जंतूप्रवेश रोखतात.९. भरपूर स्त्राव प्रमाण जिवाणू बाहेर टाकते.१०. जिवाणू रोग निर्माणाबाबत सतत संधी शोधतात..Rare Cow Birth : गाईने एकाच वेळी दिला चार वासरांना जन्म.११. गर्भाशयात जिवाणू अनिष्ट परिणाम करतात.१२. शरीरावरचा ताण जिवाणूंना संधी पुरवतो.१३. जिवाणूमुळे गर्भाशयात पू निर्माण होतो.१४. जिवाणूंसाठी बरीच प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात..१५. दाहनिर्माण करणाऱ्या जीवाणूंचे संच बदलतात.१६. सततचा प्रतिजैविक वापर शरीरातील प्रतिरोध वाढतो.१७. प्रतिजैविक शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी करतात.१८. जिवाणूमुक्त गर्भाशयासाठी उपचार खर्चिक असतो.१९. निरोगी गर्भाशयासाठी शरीराची क्षमता वाढवावी..२०. गर्भाशयदाह संपर्कातील जनावरात सहज पसरतो.२१. सुप्त गर्भाशय दाह, छुपा शत्रू असतो.२२. गर्भाशयात जिवाणूंची संख्यावाढ झपाट्याने होते.२३. मिश्र प्रकारचे जिवाणू, नवीन गटात फोफावतात.२४. गर्भाशयातील रोगजंतू, फलित गर्भ संपवतात..२५. जीवाणूंनिर्मित दाह, गर्भाशयापुरताच असतो.२६. गर्भाशयदाह प्रादुर्भाव, सतत कमी जास्त होतो.२७. गर्भाशयदाहाचा स्त्राव कासदाह शक्यता वाढवतो.२८. गर्भाशयदाहयुक्त जनावर वेदना दाखवत नाही.२९. अचूक निदानाचा पाठपुरावा नेहमी अपेक्षित.३०. गर्भाशय निरोगी तरच अधिक गर्भधारणा..संघटित प्रयत्नांची गरजमाजावर असलेल्या जनावरांचा स्वच्छ बळस माजाच्या मधल्या टप्प्यात काचपट्टीवर घेवून शाळेतसुद्धा असणाऱ्या साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून नेचे पानांची रचना पडताळणी आग्रहाने करा.माजाचा बळस प्रयोगशाळेत तपासणी करून कोणते प्रतिजैविक अधिक प्रभावी याची सोय तालुक्यात उपलब्ध करून घ्या.हमखास ५० टक्के जनावरात उपयोगी ठरणारा गर्भाशय दाहावरचा उपचार म्हणजे २/३/४ टक्के प्रमाणातील ल्युगाॅल्स आयोडीन. दुसऱ्यावेळी उलटलेल्या आणि गर्भाशय दाह हेच कारण असलेल्या प्रत्येक गायी, म्हशीत याच उपचाराचा आग्रह धरा..प्रत्येक तालुका लघु चिकित्सालयात ओझोन उपचार पद्धती सुरू करण्याची मागणी करा. प्रतिजैविकांवर मात आणि प्रभावी असणारी ओझोन उपचार पद्धती स्वस्त, सुरक्षित, सोपी आणि प्रभावी असल्याने सुप्त गर्भाशय दाह संपवता येतो.शरीरातील रोगप्रतिकारक्षमता प्रभावीपणे वाढवणारी अत्यंत परिणामकारक उपचार पद्धती म्हणजे प्रतिजैविकांचा वापर न करता सुरक्षित सहाय्यक ‘ईकोलाय एलपीएस’ किंवा ‘ओएस्टर ग्लायकोजन’ औषधी. महाग आहे केवळ खरेदीसाठी पण एक प्रभावी उपचार किंमत तीनशे फक्त आणि एका खरेदीत ५० जनावरात उपचार करता येतात. याची उपलब्धतेबाबत मागणी करा..दोनपेक्षा अधिक वेळा उलटलेली जनावरे उपचार करण्यासाठी ‘तीन पशुवैद्यकांचा संघ’ असा विचार, पाठपुरावा, धोरण, पद्धत ठरवेल अशी सोय निर्माण करण्याचे प्रयत्न करा.पशुप्रजनन विनिमयन कायद्यांतर्गत पुन्हा पुन्हा रेतनाची नोंद झाल्यास कारणे मागवण्यात येत आहेत, तेव्हा दर तीन महिन्यात, तालुक्यात एका ठिकाणी, पारदर्शक पद्धतीत एका रेतमात्रेची प्रत पडताळणी होण्यासाठी आग्रह धरा..उलटणाऱ्या जनावरात गर्भाशय दाह नसेल तर स्त्रीबीज विकृती ओळखण्यास सोनोग्राफी तपासणी उपयुक्त ठरत असल्याने अशा तपासण्या मोठ्या प्रमाणात होतील यासाठी मागणी नोंदवा.माजावर असणारी जनावरे भरविण्यासाठी दुर्बीण यंत्र उपलब्ध आहेत, तालुक्यात एक तरी असे यंत्र रेतन अचूकतेसाठी खरेदीसाठी आग्रह धरा.लिंगवर्धित रेतमात्रा वापरताना जनावरांच्या माजाबाबत अजिबात दोष नाही याची सखोल पडताळणी, तज्ञ पशुवैद्यकाकडून होण्यासाठी सजगता दाखवा..गोठ्यामध्ये गर्भाशय दाहाचे निदानपद्धत १: माजचक्र कालावधी अभ्यासा.निदानमाजानंतर ३ ते ८ दिवसास दिसून येणारा स्त्राव म्हणजे तीव्र गर्भाशयदाह. माजानंतर १३ ते १७ दिवसानंतर दिसून येणारा स्त्राव म्हणजे कमी किंवा सौम्य तीव्र स्त्राव.केवळ २१ दिवसापूर्वी ( दीड दोन दिवस कमी अधिक काळ शक्य) नोंद झालेल्या जनावरातच आज रेतन करा..पद्धत २: बळसाचा रंग आणि वास पडताळानिदानसंपूर्णपणे पारदर्शक, वासरहित, तार तुटणारा, चिकट स्त्राव अपेक्षित आणि रेतन योग्य. मात्र पांढरट, धुरकट, पिवळट किंवा पारदर्शक स्रावामध्ये / शेवटी पांढरे भाग, अधिक पातळ स्त्राव आढळल्यास रेतन टाळा..पद्धत ३: बळसाचा सामू तपासानिदान बळस हा शरीर क्रियेतील भाग असल्याने फक्त ७.० सामू अपेक्षित आणि तेव्हाच फक्त रेतन करा.बाजारातून सामू पेपर पट्टी मिळवा. एक पट्टी अर्धी करावी. दुसरी अर्धी पट्टी नंतर वापरता येते. योनीतून गळणारा तुटणारा बळस सामू पेपरवर चिटकवून होणारा रंग बदल प्रमाणकाशी तुलना करून सामू नोंद करा. सामू बदल आढळल्यास रेतन टाळा.आधुनिक युगात डिजिटल पीएच मीटर उपलब्ध आहेत, त्यांचा योग्य वापर वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवर करता येईल..पद्धत ४: बळस परिक्षण करानिदानसोडीयम हायड्रोक्साइड या रसायनाची बाटली बाजारात मिळते. दहा टक्का या प्रमाणातील रसायन आणि योनीमार्गातून स्त्रवणारा बळस सम प्रमाणात एकत्र करा, थोडा गरम करा ( ५०-६० अंश सेल्सिअस).बळस असणारा भाग पांढरा पांढरा असेल तर गर्भाशय दाह नाही, फिकट पिवळा झाला तर गर्भाशय दहाची शक्यता, दिसून येणारा पिवळा म्हणजे मध्यम प्रकारचा गर्भाशय दाह आणि गडद पिवळा म्हणजे तीव्र गर्भाशय दाह.पिवळट रंग सौम्य, फिका, ठळक, गडद असताना रेतन नको..पद्धत ५: माजाच्या बळसाची काचपट्टी बनवानिदानमाजाचा बळस योनीतून पडताना सरळ काचपट्टीवर घ्या,फक्त वाळवा आणि शहरातील माणसासाठी असणाऱ्या खासगी रोगनिदान प्रयोगशाळेत या काचपट्टीवर ग्राम स्टेन करा..पीएमएन पेशी म्हणजे अधिक केंद्रक असणाऱ्या पेशी संख्या किती याची नोंद करा. अशा पीएमएन पेशींची ५ टक्क्यांहून अधिक संख्या आढळल्यास हमखास सुप्त गर्भाशय दाह असल्याची खात्री होते.- डॉ.नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१( लेखक पशूतज्ज्ञ आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.