जनावरांना खनिज मिश्रणे देतायं ना?

खनिजे जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने, आहारातून त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा गरजेचा असतो.
Mineral Mixture
Mineral MixtureAgrowon
Published on
Updated on

जनावरांना दिल्या जाणाऱ्या वैरणीतून, पशुखाद्यातून जनावरांना प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यासोबतच काही प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत असतात. खनिजे जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने, आहारातून त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा गरजेचा असतो. खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरे विविध आजारांना बळी पडण्याचे प्रमाण वाढते.

दुधाळ जनावरांच्या शरीरातून दुधाच्या (milk) स्वरुपात रोज जीवनसत्त्वे, खनिजे बाहेर पडत असतात. सर्वसाधारणपणे एक लिटर दुधाद्वारे जनावरांच्या शरीरातून १.२ ग्रॅम कॅल्शियम (calcium) व ०.९ ग्रॅम फॉस्फरस बाहेर पडत असतो. यामुळे जनावरांच्या आहारात संतुलित प्रमाणात खनिज मिश्रणाचा पुरवठा करणे गरजेचं आहे.

Mineral Mixture
जनावरांच्या आहारात क्षारांचे महत्त्व! | Importance Of Mineral Mixture In Dairy Animals | ॲग्रोवन

आपल्याकडे बरेचसे पशुपालक जनावरांना आहारात खनिज मिश्रणे देत नाहीत. परंतु खनिज मिश्रणे न दिल्यास, जनावरांचे शारीरिक संतुलन बिघडते.

खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम आता पाहूयात-

- कालवडीची वाढ व्यवस्थितरित्या न होता, त्यामुळे कालवड वयात येण्याचे वय वाढते.

- जनावरांमध्ये खनिजांच्या कमतरतेमुळे मुक्या माजाचे प्रमाण वाढते.

- गायी-म्हशी विल्यानंतर लवकर माजावर येत नाहीत.

Mineral Mixture
अशा ठिकाणी जनावरे चरायला गेल्यास होतो जंताचा प्रादुर्भाव! | Worm infection to animals | ॲग्रोवन

- जनावरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा वांझपण येतो.

- गायी-म्हशी वारंवार उलटतात.

- अयोग्य पोषणामुळे जनावरांची कातडी निस्तेज आणि खडबडीत होते.

- रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने, जनावरे विविध आजारांना बळी पडण्याचे प्रमाण वाढते. कासेच्या आजारांचे प्रमाण वाढते.

- शरीरात खनिजांची कमतरता झाल्याने जनावरे अखाद्य वस्तू खाऊ लागतात.

- खनिजांच्या कमरतेमुळे जनावरांमध्ये गर्भपातासारख्या समस्या दिसून येतात. व्यायल्यानंतर जनावरांची वार बाहेर पडण्यास विलंब होतो. अशक्त वासरे जन्माला येतात.

- खनिजांच्या कमतरतेमुळे गाय विताना अनेक अडचणी येतात.

- कॅल्शियमची कमरता असल्यास, व्यायल्यानंतर गायीला मिल्क फिव्हर होण्याची दाट शक्यता असते.

- जनावरांचे दूध उत्पादन घटते. दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण कमी होते.

- जनावरांचे मायांग बाहेर येण्याचे प्रमाण वाढते.

या सर्व गोष्टी आणि उपचारावरील अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी आपल्या जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा समावेश करावा. दुधाळ गायी-म्हशींना दूध उत्पादनाच्या प्रमाणात आहारातून खनिज मिश्रणे देणं गरजेचं आहे.सर्वसाधारणपणे दररोज १० लिटर दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीला ५० ग्रॅम खनिज मिश्रण आहारातून दिले पाहिजे. त्यापेक्षा अधिक दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांना प्रत्येक लिटरसाठी ५ ग्रॅम अतिरिक्त खनिज मिश्रण द्यावे. इतर जनावरांच्या आहारात ३० ग्रॅम पासून ५० ग्रॅम पर्यत आहारात खनिज मिश्राणांचा समावेश करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com