Animal Disease : रेडकांमधील हायपोथर्मिया आजार ; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

Animal Care : हिवाळ्यात कमी तापमान, वातावरणातील थंडपणा आणि गोठ्याच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे रेडकांना हायपोथर्मियाचा धोका अधिक असतो.
Buffalo Calves
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. विवेक संगेकर, डॉ. बालाजी अंबोरे

हिवाळ्यात कमी तापमान, वातावरणातील थंडपणा आणि गोठ्याच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे रेडकांना हायपोथर्मियाचा धोका अधिक असतो. हे लक्षात घेऊन रेडकाचे शरीर सौम्यपणे पोते, उबदार कापड किंवा ब्लॅंकेटने झाकावे. रेडकाला सूर्यप्रकाशामध्ये ठेवून, हायपोथर्मियातून वाचविण्यास मदत होते.

हा यपोथर्मिया म्हणजे शरीराचे  तापमान सामान्य श्रेणीपेक्षा खूप कमी होणे. हायपोथर्मिया ही म्हशींच्या रेडकांमध्ये हिवाळ्याच्या हंगामात उद्‍भविणारी गंभीर अवस्था आहे. रेडकांमध्ये ही स्थिती विशेषतः थंड हवामानात, पाऊस पडत असताना किंवा योग्य देखभालीचा अभाव असल्यास दिसून येते.

Buffalo Calves
Animal Care : विल्यानंतर गाय, म्हशींचा आहार कसा असावा?

ही स्थिती बहुधा हिवाळा किंवा हवेतील थंडपणामुळे उद्भवते. नुकत्याच जन्मलेल्या रेडकांमध्ये किंवा लहान रेडकांमध्ये प्रामुख्याने आपणास हायपोथर्मिया दिसून येतो. हायपोथर्मिया हा आजार गाईचे वासरू, शेळीचे करडू आणि मेंढीचे कोकरू यांमध्ये देखील आढळून येतो; पण म्हशींच्या रेडकांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. रेडकांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते.

कारणे

  •   हिवाळ्यात कमी तापमान, वातावरणातील थंडपणा आणि गोठ्याच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे हायपोथर्मियाचा धोका अधिक असतो.

  •   रेडकांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता मर्यादित असते.

  •   शरीरातील ऊर्जेची कमतरता.

  •   कमी तापमान आणि थंड वाऱ्यामुळे उष्णतेची हानी अधिक होते, ज्यामुळे शरीराला उष्णता राखता येत नाही.

  •   वातावरणातील आर्द्रता शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला प्रभावीपणे कार्य करू देत नाही.

  •   गोठ्यामध्ये खेळत्या हवेचा अभाव.

  •   नवजात वासरांमध्ये कोलेस्ट्रमचा अभाव.

  •   रेडकांची त्वचा पातळ असते, चरबीचे साठे मर्यादित असतात, ज्यामुळे उष्णता राखण्याची क्षमता कमी होते.

  •   रेडकांचे शरीर क्षेत्रफळ-ते-वजन गुणोत्तर जास्त असल्यामुळे ही स्थिती निर्माण होते.

Buffalo Calves
Animal Care : जनावरांमधील जखमांवर प्राथमिक उपचार

लक्षणे

  •   शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप कमी असते.

  •   कान, नाक आणि पाय थंड पडतात.

  •   वासरे निष्क्रिय आणि थकल्यासारखी दिसतात.

  •   पायांवर उभे राहण्यास किंवा फिरण्यास समस्या उद्‍भवते.

  •   रेडकाची हृदयाची गती कमी होते.

  •   चयापचयाशी संबंधित समस्या निर्माण होणे, जसे की ऊर्जेची कमतरता, असंतुलित इलेक्ट्रोलाइट्स इत्यादी.

  •   भूक कमी होते, दूध पिण्याची इच्छा कमी होते. अवयवांचे कार्य बिघडणे. श्‍वसनाची गती मंदावते.

  •   शरीराच्या स्नायूंमध्ये कंपन होऊ शकते.

  •   शरीर तापमानात खूप घट झाल्यास रेडकू कोमात जाते. गंभीर अवस्थेत मृत्यू होण्याचा धोका असतो.

निदान

  •   रेडकाच्या शरीराचे तापमान मोजणे हे हायपोथर्मियाचे निदान करण्याचे मुख्य साधन आहे.

  •   शरीराचे सामान्य तापमान १०१ अंश फॅरेनहाइट ते १०२ अंश फॅरेनहाइट दरम्यान असते, जर तापमान ९८ अंश फॅरेनहाइटपेक्षा कमी झाल्यास, हायपोथर्मिया असण्याची शक्यता वाढते.

  •   तापमान जितके कमी, तितका गंभीर स्वरूपाचा हायपोथर्मिया असू शकतो.

  •   शरीराचे तापमान कमी होणे, निष्क्रियता, शारीरिक कंप आणि श्‍वसन समस्या ही लक्षणे आढळतात.

  •   हायपोथर्मियाच्या स्थितीमध्ये हृदयाची गती आणि श्‍वसन गती कमी होते.

  • उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

  •  रेडकाचे शरीर सौम्यपणे पोते, उबदार कापड किंवा ब्लॅंकेटने झाकावे.

  •  रेडकाला सूर्यप्रकाशामध्ये ठेवून, हायपोथर्मियातून वाचविण्यास मदत

  • होते.

  •  संध्याकाळच्या वेळी वासराशेजारी शेकोटी करून, तातडीने उब देता येते.

  •  रेडकाला जन्मानंतर लगेच कोलेस्ट्रम द्यावे.

  • रेडकाला त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्के कोलेस्ट्रम (चीक) द्यावे. जेणेकरून आवश्यक ऊर्जा, प्रथिने आणि प्रतिकारशक्ती प्राप्त होते.

  •  रेडकाला ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स पशुवैद्यकाच्या मदतीने द्यावे. जेणेकरून हायपोथर्मियाची स्थिती सुधारेल.

  •  थंडीपासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या गोठ्याचे व्यवस्थापन करावे.

  •  हिवाळ्यात गोठ्याला चारही बाजूंनी उबदार पडदे किंवा पोती बांधावीत. म्हणजे गोठ्यात थंड हवा शिरणार नाही. गोठा उबदार राहण्यास मदत होईल.

- डॉ. विवेक संगेकर, ९०७५८८९४९०

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com