Goat Farming : गाभण शेळ्यांना कसे जपाल?

वातावरणातील बदलामुळे गाभण शेळ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

शेळीपालनाचे (Goat Farming) उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. पावसाळ्यात शेळ्यांचे गाभण राहण्याचे तसेच विण्याचे प्रमाण इतर ऋतूपेक्षा जास्त असते. वातावरणातील बदलामुळे गाभण शेळ्यांचे (Pregnant Goat ) आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी व्याली पाहिजे. शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीने गाभण शेळ्यांचा आहार आणि आजाराविषयी पुढील माहिती दिली आहे.

Goat Farming
Goat Farming : शेळ्या-मेंढ्यांमधील फूटरॉट

गाभण शेळ्यांचा आहार कसा असावा?

गाभण शेळ्यांना वाळलेला ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.

गाभण काळातील शेवटचा किमान १ महिना व्यायच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा. गोठ्यातच फिरण्याची सोय असणे गरजेचे आहे.

गाभणकाळात शेवटच्या ३-४ आठवड्यामध्ये गर्भाशयातील पिल्लांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचा चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा.

स्वच्छ पाणी द्यावे. थंड पाणी किंवा पावसाचे पाणी देऊ नये त्यामुळे शेळ्यांना सर्दी सारखे आजार होऊ शकतात.

शक्यतो पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा जसे कि भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून द्यावे.

Goat Farming
शेळ्यांचा घातक आंत्रविषार रोग

आजारांवर नियंत्रण कसे मिळवाल?

पावसाळ्यात शेळ्यांना गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवतात. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते.गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात. पावसाळ्यात हिरवा ओला चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे गाभण शेळ्यांमध्ये अंग बाहेर येणे हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो असे असल्यास पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करून घ्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com