
Animal Diseases : गोठ्यातील जनावरांच दैनंदिन निरीक्षण हे व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे. निरीक्षणामुळ जनावरांचे आजार, आरोग्य, आहाराबद्दल पूर्वकल्पना मिळते, त्यामुळे व्यवस्थापनात योग्य ते बदल करण शक्य होत. व्यवस्थापनातील योग्य बदलावरच दुग्धव्यवसायाच यश अवलंबून असत.
निरीक्षणातून जनावरांचे आजार कसे ओळखायचे?
- गोठ्यातील गाभण, विणाऱ्या जनावराचे निरीक्षण केल्यास विण्याचा कालावधी, विण्यातील अडथळा, झार अडकणे या समस्या लक्षात येऊन वेळीच योग्य उपचार करण शक्य होत.
- जनावराने कोणता पाय उचलून धरला आहे का? टेकवत नाही का? पायावर सूज आहे का? मार लागला आहे का? याची नोंद घेऊन योग्य ते उपचार करता येतो.
- जनावराची कास सर्वसाधारण आहे का? सूज आलेली आहे का? याच निरीक्षण कराव. जेणेकरून कासदाह आजारावर तात्काळ उपचार करण शक्य होईल. जनावराच्या कासेचा कमी होणारा आकारही लक्षात घ्यावा. जेणेकरून कोणत्या तरी घटकाची कमतरता आहे किंवा कासेचा आजार लक्षात येऊन दूध उत्पादनात होणारी घट टाळता येते.
- जनावरांच्या शेपटीवरचे केस कमी होत आहेत, शेपूटगोंड्याचे पूर्ण केस गेले आहेत का? ते पाहाव यावरून शेपटीला जंतुसंसर्ग, सरड्या या रोगाच योग्य निदान करून उपचार करण शक्य होत.
- जनावराच्या शरीरावर कुठे सूज आहे का? म्हणजे बेंबीजवळ, पुढच्या दोन्ही पायाच्या मध्ये, जबड्याच्या ठिकाणी पाहावे यावरून बेंबीची अंतर्गळ म्हणजेच हर्निया, बेंबीला झालेला जंतूसंसर्ग, दोन्ही पुढच्या पायांच्यामध्ये सूज असल्यास पोटात गेलेली अखाद्य वस्तू, जबड्याखालील सूजेवरून घटसर्प, जंतप्रादुर्भाव याचे निदान करता येते.
- दोन्ही डोळ्यांच निरीक्षण कराव. डोळे पाणीदार, टवटवीत आहेत का? डोळ्यातून स्राव किंवा घाण येत आहे का? ते पाहाव. डोळा पांढरा, निळा झाला आहे का? ते पाहाव. यावरून डोळ्यांचे आजार, डोळ्याला लागलेला मार लक्षात येऊन वेळीच उपचार होतात. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळेही जनावरांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत.
- जनावरांच्या पुढच्या बाजूंनी पाहणी करताना नाकपुडीच निरीक्षण कराव. कोरडी नाकपुडी जनावर आजारी असल्याचे दर्शवते तर पाणीदार नाकपुडी जनावर निरोगी असल्याचे दर्शवते.
- जनावराच्या तोंडातून सतत लाळ गळते का ते पाहाव जर सतत लाळ गळत असेल तर तोंडामध्ये जखमा किंवा लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव किंवा पिसाळणे यासारखे आजार असू शकतात. इतर लक्षणांची सांगड घालून त्याचे योग्य निदान होऊ शकते.
- बऱ्याच गायी/म्हशी शिंग गोठ्यामध्ये गव्हाणीवर किंवा भिंतीवर आदळतात, यामध्ये एकतर कानाच्या मधल्या भागाला सूज येऊन कानात पू तयार होणे किंवा शिंगाचा कॅन्सरही असण्याची शक्यता असते.
- काही जनावरं सतत दात खातानाचा आवाज येतो किंवा कण्हण्याचा आवाज येतो. अशा जनावरामध्ये एकतर पोटशूळ किंवा इतर आजार असण्याची शक्यता असते.
- बऱ्याचवेळा म्हशीमध्ये काळ्या त्वचेवर सुरवातीला काही भागावर पांढरे ठिपके दिसतात व नंतर हळूहळू त्याचा आकार वाढत जातो. अशावेळी कॉपरच्या कमतरतेमुळे पांढरे ठिपके दिसून येतात. यासाठी तज्ज्ञांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.