How to make silage?
How to make silage?Agrowon

Silage Making: मुरघास कसा तयार करावा?

उन्हाळ्यामध्ये किंवा चारा टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असताना हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवता येतो.

उन्हाळ्यामध्ये किंवा चारा टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असताना हिरव्या चाऱ्याचा (Green Fodder) मुरघास बनवता येतो. हिरव्या चाऱ्याची योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास (Silage) करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येतो.  हिरवा चारा हवाविरहित जागेत ठराविक काळ ठेवल्यावर, आंबवण्याची क्रिया होऊन जो चारा तयार होतो, त्याला मुरघास म्हणतात. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण राखले जाते, तसेच पौष्टिकतेत व चवीत वाढ झाल्यामुळे जनावरे मुरघास आवडीने खातात. 

How to make silage?
Silage : मुरघास निर्मिती व्यवसायाची निवड ठरली सार्थ

सर्वसाधारणपणे आपल्याकडे फक्त पावसाळ्यातील तीन ते चार महिने हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु वर्षातील उरलेल्या आठ ते नऊ महिन्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. या अडचणीवर मात करण्यासाठी मुरघास हा रामबाण उपाय आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मुरघास कसा तयार करावा या विषयी पुढील माहिती दिली आहे.  

How to make silage?
‘मुरघास’ बनविताना थर कसे द्याल?

मुरघास तयार करण्याची पद्धत ?

- मका, ज्वारी इत्यादी एकदल पिकांच्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास करता येतो. मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ असताना कापावे. ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यावर असताना कापावे.  

- चाऱ्याची कुट्टी करून खड्ड्यामध्ये भरावी. खड्डा भरत असताना वरून सतत दाब द्यावा. त्यामुळे खड्ड्यात हवा राहणार नाही. खड्ड्यामध्ये हवा राहिल्यास चारा कुजण्याचा संभव असतो. 

- चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याकरिता १.५ टक्के गुळाचे पाणी तसेच १ टक्का युरिया पाण्यात मिसळून चाऱ्याचा प्रत्येक थरावर फवारावा. 

- खड्डा पूर्ण भरल्यानंतर खड्ड्याच्या पृष्ठभागावर एक ते दोन फूट उंच वैराणीचा  ढिग करावा आणि त्यावर निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेंड्याचा थर पसरावा. त्यानंतर शेण व चिखल यांच्या मिश्रणाचा थर देऊन खड्डा झाकून टाकावा. 

- खड्ड्यावर पॉलिथिन पेपर सुद्धा अंथरण्यास हरकत नाही. मुरघास तयार होण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर खड्ड्याच्या तोंडाला छिद्र पाडून त्यातून रोज मुरघास काढून घ्यावा. मुरघास काढून घेतल्यानंतर त्यावर वाळलेले गवत वगैरे घालून तोंड बंद करावे. 

- दुभत्या  जनावराला दररोज दहा ते पंधरा किलो मुरघास खाऊ घालावा. मुरघास आंबट गोड, चारा असतो त्यामुळे जनावरे आवडीने खातात. पावसाळ्यात जादा असलेला ओल्या वैरणीचा मुरघास तयार करून चारा टंचाईच्या काळात जनावरांना खाऊ घालावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com