कसा वाचवायचा पशुखाद्यावरील खर्च ?

घरच्या घरी पशुखाद्य निर्मिती करून, जनावरांच्या आहारावरील अतिरिक्त खर्च कमी करता येऊ शकतो.
Animal Feed at low cost
Animal Feed at low costAgrowon
Published on
Updated on

आपल्या गोठ्यातील जनावरांची त्यांच्या वयानुसार तसेच शारीरिक अवस्थेनुसार पोषक तत्वांची गरज बदलत असते. ही बदलणारी गरज त्यांना त्यांच्या रोजच्या आहारातून मिळणे गरजेचे असते. रोजची गरज भागविली गेली नाही तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. परिणामी जनावरे आजारी पडायला लागतात. जनावरांच्या आहाराचे नियोजन करीत असताना, पशुपालकांकडे उपलब्ध असलेला चारा विचारात घ्यायला हवा. उरलेली पोषणमुल्ये पशुखाद्यातून जनावरांना मिळाली पाहिजे.

पशुखाद्य निर्मिती

- पशुखाद्याची निर्मिती म्हणजे आपल्याकडील उपलब्ध धान्ये किंवा कृषी प्रक्रियेतील उपपदार्थ यांवर प्रक्रिया करून ते जनावरांसाठी खाण्यायोग्य बनवावे.
- बाजारात उपलब्ध असेलेले पशुखाद्य हे बाजारात उपलब्ध असलेला कच्चा किंवा प्रक्रिया केलेला माल वापरून बनविले जाते.
- हे पशुखाद्य बनविताना जनावरांची पोषकमुल्यांची गरज भागविली जाईल याचा विचार करून बनविले जाते.
- चांगल्या प्रतीच्या उत्तम गुणवत्ता असणाऱ्या व योग्य फॉर्म्यूला वापरून एकत्र एकजीव केलेल्या संतुलित पशुखाद्याला जनावरे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात.
- पशुखाद्याच्या गुणवत्तेवर जनावरांची उत्पादनक्षमता अवलंबून असते.
- जनावरांना शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी लागणारे घटक, यासाठी पशुखाद्य तयार करताना त्याची गुणवत्ता एकसारखी राहील याची काळजी घ्यावी.

Animal Feed at low cost
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणा

सध्या पशू आहाराचे वाढलेले दर, असंतुलित चारा व पशुखाद्याचे प्रमाण यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. यावर उपाय म्हणून घरच्या घरी उपलब्ध साधनसामग्रीपासून पशुखाद्य निर्मिती करून आहारावरील खर्च काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com