Poultry Management : कोंबड्यांतील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वनौषधी

Poultry Care : उष्ण वातावरणामुळे जनावरे, कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो. ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे ताण निर्माण होतो.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming : उष्ण वातावरणामुळे जनावरे, कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो. ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे ताण निर्माण होतो. कोंबड्यांतील ताणासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात यापैकी उष्णतेचा ताण हा प्रमुख घटक आहे.

उष्णता जास्त वाढल्यामुळे कोंबड्या शरीराचं  तापमान नियंत्रित करण्यासाठी  शेडमध्ये वापरलेली गादी म्हणजेच जामिनावर अंथरलेले तूस बाजूला सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. तसंच कोंबड्या पाण्याचे पाइप, पाण्याच्या भांड्याजवळ बसुन  आपल्या शरिराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या खाली असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा ताण जस्त जाणवत नाही. पण तापमान जर ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढतं तेंव्हा, शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणं आवश्यक असतं. छत थंड ठेवण्याकरिता छतावर सुक्या चाऱ्याचे आच्छादन करावे. शक्य असल्यास छतावर व पडद्यावर दिवसातून ३ ते ४ वेळेस पाण्याची फवारणी करावी.

Poultry Diseases
Poultry Farming : कोंबड्यांतील ताण कमी करण्याचे उपाय


कोंबड्यांतील उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा आणि संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा. यासाठी संत्री किंवा लिंबू ३० ते ४० ग्रॅम प्रति १०० कोंबडी या प्रमाणात वापरावं. उष्णतेचा ताण कमी करण्याकरिता लिंबू किंवा संत्र्याची साल देखील उपयुक्त आहे.


अश्वगंधा,तुळस,मंजिष्ठा,शतावरी या औषधी वनस्पतींचा वापर देखील कोंबड्यांच्या आहारातून करावा. अश्वगंधा- ४ ग्रॅम, तुळस-४ ग्रॅम, मंजिष्ठा-४ ग्रॅम, शतावरी-५ ग्रॅम घेऊन या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात. 


याशिवाय कोंबड्यांना सकाळी आणि संध्याकाळी अशा थंड वेळेत खाद्य द्यावं. दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये. कारण सकाळी कोंबड्यांच्या शरीरात उष्णता उत्पादन २० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी असतं.खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत दोन तासापर्यंत परिणाम दाखवते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासापर्यंत असतो. म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी कोंबड्यांतील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.


औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व क आणि ई चा वापर करावा. जीवनसत्त्व ई चा साधारपणे २५० मिलग्रॅम प्रतिकिलो खाद्य आणि जीवनसत्त्व क चा वापर ४०० मिलीग्रॅम प्रतिकिलो खाद्य करावा. सोबतच इलेक्ट्रोलाईटस आणि डेक्सट्रोज चा वापर अत्यंत आवश्यक आहे.


कोंबड्यांची शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक व संतुलित प्रमाणात सतत असणं आवश्यक आहे. अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा. याकरिता कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वनस्पती तेलाचा योग्य प्रमाणात वापर करावा. अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून वाचवता येते. 

--------------------------

माहिती आणि संशोधन -  पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर

------------------

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com