उष्ण कटीबंधातील देशातील शेळ्या (goat) साधारणपणे वर्षभर माजावर येत असतात. परंतु स्थानिक हवामान, पर्जन्य आणि चाऱ्याची उपलब्धता या सर्व गोष्टींचा शेळ्यांच्या ऋतुचक्रावर (estrus cycle) परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतो, अशा ठिकाणी विशिष्ट हंगामातच चारा उपलब्ध होत असतो. अशा प्रकारचे व्यवस्थापन असल्यास शेळ्या हंगामी स्वरूपाचे प्रजजन चक्र (reproduction) दाखवितात.
सर्वसाधारणपणे शेळ्या जून-जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर, फेब्रुवरी-मार्च या कालावधीत माजावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. यातही शेळ्या पावसाळ्यात माजावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७० टक्क्याच्या आसपास असते.
शेळ्यांचे ऋतुचक्र सरासरी १८ ते २२ दिवसांचे असते. माजाचा कालावधी १८ ते २२ तासांचा असतो. शेळ्यांनी माजाची लक्षणे दाखविल्यापासून १२ तासानंतर शेळीला बोकड लावावा किंवा कृत्रिमरीत्या भरवून घ्यावी.
शेळ्या आठ ते नऊ महिन्याच्या झाल्यावर त्या पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करतात. परंतु शेळ्या एक वर्षाच्या होईपर्यंत त्यांना भरवून घेऊ नये. प्रजननासाठी वापरायच्या बोकडाचे वय दीड वर्षाच्या पुढे असायला हवं. साधारणपणे नैसर्गिक रेतनासाठी २० ते २५ शेळ्यांच्या कळपामध्ये एक बोकड ठेवावा लागतो.
शेळीपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी जातिवंत शेळ्यासाठी निवड पद्धतीचा वापर, शेळ्या एकाच वेळी माजावर आणण्याचे तंत्र यांचा वापर केला पाहिजे. शेळ्यांचा गाभण काळ इतर जनावरांच्या तुलनेत कमी असतो. दोन वर्षामध्ये शेळ्या तीन वेळा वितात. गाभण काळामध्ये शेळयांची विशिष्ट काळजी घेणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच वेळा गाभण काळामध्ये शेळ्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना त्रास होतो किंवा सशक्त पिल्ले जन्माला येण्यात अडथळा निर्माण होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.