Animal Care : दुधाळ जनावरांतील माजाचे ऋतुचक्र

Milch Animal : माजाचे ऋतुचक्र हे एका माजाच्या टप्प्यापासून सुरू होते आणि दुसऱ्या टप्प्यात संपते. जनावरांतील ऋतुचक्र समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे जनावरांतील उत्पादन वाढ आणि वेळेवर गर्भधारणा करणे सोपे जाते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिल पाटील

साधारणपणे जून ते फेब्रुवारी हा कालावधी प्रजननदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीत दुधाळ जनावरांतील प्रजननाचे कार्य सुरळीतपणे चालू होत असते. दोन माजांतील अंतर २१ दिवसांचे असते. त्यामुळे जनावरांतील माजाचे व्यावसायिकदृष्ट्या योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रजननाच्या प्रत्येक बाबींची नोंदवहीत नोंद ठेवावी.

माजाच्या कालावधीत माज चार टप्प्यांत विभागला गेला आहे. यामध्ये मुख्य माजापूर्वीची अवस्था, मुख्य माज, मुख्य माजानंतरची अवस्था आणि माजाच्या शेवटची अवस्था. महत्त्वाचे म्हणजे माजाचे ऋतुचक्र हे एका माजाच्या टप्प्यापासून सुरू होते आणि दुसऱ्या टप्प्यात संपते. अशाप्रकारे गाभण होईपर्यंत चालू असते. गाभण कालावधीत माजाचे ऋतुचक्र बंद होत असते. जनावरांतील ऋतुचक्र समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे जनावरांतील उत्पादन वाढ आणि वेळेवर गर्भधारणा करणे सोपे जाते.

Animal Care
Animal Care: दूध वाढीसाठी जनावरांना चारा देताना काय काळजी घ्यावी ?

मुख्य माजाची लक्षणे

अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, लघवी करणे, खाद्य-पाणी कमी करणे.

योनीमार्ग सुजल्यासारखे दिसणे. नराकडे आकर्षित होणे. नैसर्गिक संयोगासाठी तयार असणे.

योनीमार्गात चिकट, काचेसारखा चकाकणारा, पारदर्शक स्राव दिसून येणे. पाठीवर थाप मारल्यानंतर शेपूट वर करणे. सोबतच्या जनावराच्या पाठीवर पाय टाकणे.

माज ओळखण्याच्या मुख्य पद्धती

  • सकाळ-संध्याकाळ माजाचे निरीक्षण करणे.

  • संप्रेरकाचा वापर करून माज ओळखणे.

  • ध्वनी रेकॉर्ड ठेवण्याची प्रणालीचा वापर.

नोंद

  • प्रजननविषयक सर्व नोंदीची नोंद वहीत नोंद करावी किंवा विविध प्रणालीद्वारे वापरली जात असलेली साधनाचा वापर करावा.

Animal Care
Animal Care : संतुलित आहार, गोठा स्वच्छतेवर भर

स्पिनबार्केट टेस्ट

  • जनावर माजावर असताना योनीमार्गे स्राव येतो, तो दोन काचेच्या पट्टीवर किंवा दोन बोटांच्या चिमटीत घेऊन त्याची लांबी व चिकटपणा मोजला जातो. जेवढा जास्त चिकटपणा तेवढा चांगला माज, असे यावरून सिद्ध होते.

माज अपेक्षा तक्ता

  • कृत्रिम रेतन संस्थांकडे विशेष कॅलेंडर/दिनदर्शिका उपलब्ध असतात. बहुतेक तक्ते २१ दिवसांच्या चक्रावर आयोजित केले जातात, जेणेकरून भविष्यातील माजाचा अंदाज लावता येईल. काही कळप व्यवस्थापक गर्भधारणेनंतर १९ वा दिवस चिन्हांकित करतात. जेणेकरून अपेक्षित माजाचा अंदाज अनेक दिवस अगोदर लावता येऊ शकतो.

ब्रीडिंग व्हील किंवा हर्डेक्स रेकॉर्ड सिस्टीम

  • भिंतीवर लटकविलेली प्रजनन नोंद प्रणाली / रेकॉर्ड सिस्टीम प्रत्येक गायीसाठी पुनरुत्पादक घटना दर्शविण्यासाठी रंग-चिन्हांकित पीन किंवा खुणा वापरतात. एकतर पारदर्शक प्लॅस्टिक पिन फिरवून किंवा दररोज प्लॅस्टिक कव्हर सरकवून, भविष्यातील माज आणि पुनरुत्पादक घटनांचा अंदाज लावला जाऊ शकतो.

संगणकाद्वारे तयार केलेल्या कृती सूची

  • संगणक प्रणालीद्वारे गायींची सूची तयार करता येते. ज्यांना विशिष्ट दिवशी विशेष लक्ष देणे किंवा कारवाई करणे आवश्यक असते, अशा प्रकारची सूचना संगणकाद्वारे समजते.

माउंट डिटेक्शन (कामर प्रेशर-सेन्सेटिव्ह माउंट डिटेक्टर)

  • पारंपरिक माउंट डिटेक्टर, जसे की कामार उपकरणे आणि शेपटी रंगवल्याची खुणाचा वापर करणे. जेव्हा दृश्य निरीक्षणाला पूरक म्हणून माउंट डिटेक्टर प्रणाली वापरली जाते, तेव्हा सामान्य गर्भधारणा दर आणि सुधारित माज शोधण्याची कार्यक्षमता वाढते.

माज ओळखण्याचे फायदे

  • गर्भधारणा ओळखणे : यशस्वी गर्भधारणा झाली असल्यास माजाचे ऋतुचक्र बंद होत असते. योग्य माज ओळखल्यामुळे वेळेत जनावरे गाभण राहतात.

  • दोन वासरांतील अंतर : अचूक माज ओळखल्यामुळे प्रसूतीनंतर वेळ वाया जात नाही. तसेच वर्षाला वासरू शक्य होते.

  • गर्भाशयाचे आरोग्य : नियमितपणे माजाचे निरीक्षण केल्यामुळे योनिमार्गातील स्रावावर लक्ष ठेवू शकतो. काही वेगळ्या प्रकारचा माज असेल, तर वेळीच पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करू शकतो.

  • स्राव चाचणी : माजाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यामुळे, काचपट्टीद्वारे स्रावाची चाचणी करून योग्य किंवा अयोग्य माज ओळखता येतो.

  • माजाचा प्रकार : वेळोवेळी माजाची लक्षणे निरीक्षण केल्यास माजाचा प्रकार ओळखू शकतो, जसे की सुरुवातीचा माज, मधला माज व शेवटचा माज. साधारणपणे मधला माज हा योग्य माज असतो त्या वेळी रेतन प्रक्रिया यशस्वी होऊ शकते.

  • कृत्रिम रेतनाची वेळ : कृत्रिम रेतनाची योग्य वेळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निश्‍चित करणे गरजेचे असते. स्त्रीबीज सुटण्याच्या वेळेवर कृत्रिम रेतन केल्याने गर्भधारणेचे प्रमाण जास्त होते. म्हणूनच वेळेवर कृत्रिम रेतन करणे आवश्यक असते.

- डॉ. अनिल पाटील,

९८२२०६९०९९

(प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुप्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com